आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करालता मंगेशकर यांच्या निधनाने केवळ बॉलिवूड स्टार्सच नाही तर संपूर्ण देश दु:खी झाला आहे. लता मंगेशकर यांच्यावर रविवारी संध्याकाळी मुंबईतील शिवाजी पार्कवर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यादरम्यान बॉलिवूड सुपरस्टार शाहरुख खान त्याची मॅनेजर पूजा ददलानीसोबत शिवतीर्थावर पोहोचला होता.
शाहरुख आणि पूजाने लता मंगेशकर यांना दोन प्रकारे एकत्र श्रद्धांजली वाहिल्याचा एक सुंदर फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये शाहरुख खान दोन्ही हात पसरून लता मंगेशकर यांच्यासाठी इस्लामिक विधींमधून प्रार्थना करताना दिसत आहे. तर पूजा ददलानी हात जोडून नमस्कार करताना दिसत आहे.
लता मंगेशकर यांच्यासाठी प्रार्थना करतानाचा शाहरुख खानचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. शाहरुख खानच्या हातात फुलांचा हार असल्याचे या व्हिडिओत दिसत आहे. शाहरुख प्रथम लता मंगेशकर यांच्या पार्थिवावर फुलांचा हार अर्पण करतो आणि नंतर लतादीदींच्या आत्म्याला शांती मिळावी यासाठी प्रार्थना करतो आणि त्यांच्यावर फुंकर घालतानाही दिसत आहे.
एवढेच नाही तर लताजींसाठी प्रार्थना केल्यानंतर शाहरुख त्यांच्या पायाला हात लावून आशीर्वाद घेताना दिसला. त्याचवेळी शाहरुखची मॅनेजर पूजा ददलानी लतादीदींना हात जोडून नमस्कार करताना दिसली.
शाहरुख आणि पूजाच्या या फोटोवर सोशल मीडियावर लोक तीव्र प्रतिक्रिया देत आहेत. काही लोक या फोटोचा मेसेज आयडिया ऑफ इंडियाशी जोडून पाहत आहेत, तर काही लोक त्यांच्या धार्मिक श्रद्धेच्या आधारावर यावर प्रतिक्रिया देत आहेत.
पार्थ कार नावाच्या युजरने या फोटोवर प्रतिक्रिया दित लिहिले, ' 'एक देश कई धर्म...और मैं इसी भारत में पला बढ़ा हूं'
शुभम नावाच्या युजरने लिहिले, 'हे इंटरनेटवरील सर्वात सुंदर चित्र आहे, प्रेम सर्वांवर विजय मिळवेल'
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.