आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
 • Marathi News
 • Entertainment
 • Bollywood
 • Shah Rukh Khan, Salman Khan, Alia Bhatt, Ranveer Singh, Akshay Kumar, Nusrat Bharucha 's Projects Stuck Due To Corona Curfew In Maharashtra

महाराष्ट्रात कोरोना कर्फ्यू:1 मे पर्यंत कोणतेही चित्रीकरण नाही, शाहरुखच्या 'पठान' आणि सलमानच्या 'टाइगर 3'चे होणार नाही नुकसान, अक्षयचा 'रक्षाबंधन' शूटिंग सुरु होण्यापूर्वीच थंड बस्त्यात

अमित कर्ण9 महिन्यांपूर्वी
 • कॉपी लिंक
 • कोरोनाच्या संचारबंदीमुळे महाराष्ट्रात 1 मे पर्यंत कोणतेही चित्रीकरण नाही
 • शाहरुख, सलमान आणि आलियसह मोठ्या अभिनेत्यांचे चित्रपट थंड बस्त्यात

महाराष्ट्रात कोरोना संचारबंदीमुळे अनेक मोठ्या अभिनेत्यांचे चित्रपट थंड बस्त्यात गेले आहेत. त्यात शाहरुखचा ‘पठान’, सलमानचा ‘टायगर 3’, आलिया भट्टचा ‘डार्लिंग्स’ आणि ‘गंगूबाई काठियावाडी’, अक्षय कुमारचा ‘रक्षाबंधन’, रणवीर सिंहचा चित्रपट आणि नुसरत भरूचाच्या वेब शोसह अनेक प्रोजेक्टचा समावेश आहे. दुसरीकडे लखनऊमध्ये सिद्धार्थ मल्होत्राने ‘मिशन मजनू’ चित्रीकरण मुदतीपूर्वी संपवले आहे. राज्यात कोरोना संचारबंदीमुळे 1 मेपर्यंत कुठलेही चित्रीकरण होणार नाही.

 • दोन चित्रपटांचे चित्रीकरण थांबूनही यशराजचे नुकसान नाही

‘पठान’ आणि ‘टायगर 3’ या दोन्ही चित्रपटांचे यशराज स्टुडिओमध्ये सुरळीत चित्रीकरण सुरू होते. आतापर्यंत दोन्ही चित्रपटांचे 40 ते 45 टक्के चित्रीकरण पूर्ण झाले आहे. मात्र, कोरोना संचारबंदीमुळे आता त्यांचे चित्रीकरण थांबवण्यात आले आहे. दोन्ही बिग बजेट चित्रपट आहेत. पण, त्यांचे चित्रीकरण थांबवल्यामुळे निर्मात्यांचे काहीही नुकसान झाले नाही. कारण या दोन्ही चित्रपटांचे चित्रीकरण निर्मात्यांच्या स्वतःच्या स्टुडिओमध्ये सुरू होते.

 • निर्माते गोव्याकडे वळले

दुसरीडे अनेक चित्रपट निर्माते चित्रीकरणासाठी मुंबईच्या बाहेर जात आहेत. उदाहरणा दाखल ‘एक ‌‌व्हिलन 2’ आणि शाहिद कपूरच्या वेब शोचे घेता येईल. शाहिद गेल्या काही दिवसांपासून गोव्यामध्ये राशी खन्नासोबत आपल्या वेब शोच्या चित्रीकरणामध्ये व्यग्र आहे. आता ‘एक व्हिलन 2’ चित्रपटाची टीमही गोव्याला पोहोचली आहे. जॉन अब्राहम, दिशा पाटणी, अर्जुन कपूर, तारा सुतारिया यांच्या भूमिका या चित्रपटात आहेत. या चित्रपटाच्या पहिल्या भागाचे चित्रीकरण मुंबईत पूर्ण करण्यात आले आहे.

 • हे चित्रीकरणही सापडले कोंडीत
 1. आलिया भट्टचा ‘डार्लिंग्स’ चित्रपट तूर्तास थांबल्यात जमा आहे. सुरुवातीला आलिया आणि त्यानंतर चित्रपटाच्या दिग्दर्शकाला कोरोनाची लागण झाली. आता त्यानंतर कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे संचारबंदी लागू करण्यात आली आहे. रणवीरसोबत आलिया ज्या चित्रपटात काम करत आहे, त्या चित्रपटालाही तूर्तास ग्रहण लागले आहे.
 2. अक्षय कुमारच्या ‘रक्षाबंधन’ चित्रपटाचे चित्रीकरण पुढील आठवड्यात सुरू होणार होते. मुंबईतील मीरा भायंदर भागात ‘जीसीसी हॉटल अँड क्लब’ बुक करण्यात आला होता. मात्र, आता हे चित्रीकरणही तूर्तास थांबलेच आहे.
 3. नुसरत भरुचा आणि सोहम शाह एका वेब शोच्या नियोजनात व्यग्र होते. मात्र, हा प्रकल्पही कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे थांबवण्यात आला आहे.
बातम्या आणखी आहेत...