आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
आजच्या दिवशी शाहरुखच्या करिअरमधील एक मोठा चित्रपट रिलीज झाला होता. त्यातूनच त्याला प्रसिद्धी मिळाली. 12 नोव्हेंबर 2004 रोजी 'वीर-जारा’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला आणि या चित्रपटाने प्रेक्षकांची पसंतीची पावती मिळाली. या चित्रपटाच्या रिलीजला 16 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने चित्रपटाशी संबंधित लोकांनी दिव्य मराठीला खास आठवणी सांगितल्या आहेत.
आदीने यशजींना ध्यानात ठेवून लिहिली होती ‘वीर-जारा’ - अनिल मेहता, सिनेमेटोग्राफर
आदि आणि यशजीने ‘वीर-जारा’मध्ये एकत्र काम केल्याचे पाहून मला खरोखर आश्चर्य वाटले. खरं तर, या चित्रपटाची पटकथा आदिंनी लिहिली होती आणि मला आठवतंय, बोलताना एकदा त्याने मला सांगितले होते, त्यांनी यश चोप्रा यांना ध्यानात ठेवून हे लिहिले होते. खरंच, यश चोप्रा हा चित्रपट बनवतील तर तो कसा होईल,आदि हे समजून घेण्याचा प्रयत्न करत होता. म्हणूनच या चित्रपटाच्या यशाचे संपूर्ण श्रेय चित्रपट निर्मात्यास देण्यात आले. त्यांच्या मुलाकडून ही सर्वोत्तम श्रद्धांजली असल्याचे मला वाटते. या चित्रपटातील पूर्ण दृश्य यशजीच्या नजरेतून लिहिणे आणि त्यांची भावना पडद्यावर आणण्याचे पूर्ण श्रेय आदीला जाते. आदिने सेटवर प्रत्येक गोष्ट समजून घेत मोठ्या धैर्याने काम केले.
‘वीर-जारा’ एक उच्च गुणवत्तेची क्लासिक प्रेमकथा होती. त्याची भाषा आणि संवादाची कुठेच तुलना केली जाऊ शकत नाही. त्यामुळेच हा चित्रपट उत्कृष्ट ठरला. यश चोप्राच्या चित्रपटात सर्वांना बरोबरीचा दर्जा असतो. सेटवर अशी क्वालिटी असायला हवी. मग तो बॉलिवूडचा मोठा स्टार असो की मोठा दिग्दर्शक सेटवर काम सुरू झाल्यानंतर सर्वांचा दर्जा सारखाच असतो. सर्वांनीच या चित्रपटात जीवतोडून काम केले. सर्वांनी योगदान दिले. शर्मिष्ठा रॉय, आर्ट डायरेक्टरनेदेखील ‘वीर-जारा’च्या लूकमध्ये मोठे योगदान दिले. चित्रपटातील प्रत्येकाला याच्या यशाचे श्रेय जाते.
यशजींना ‘तेरे लिए’ इतके पसंत होते की त्यांनी शेवटच्या क्षणापर्यंत हीच रिंगटोन ठेवली. - संजीव कोहल, संगीतकार मदन मोहन यांचा मुलगा
‘वीर-जारा’ चित्रपटाचे संगीतदेखील आयकॉनिक आहे. कारण यात प्रेक्षकांचे स्वागत स्वर्गीय मदन मोहन यांच्या ‘तेरे लिए’ सारख्या सुंदर गाण्याने करण्यात आले हाेते. यशजींना हे गाणे इतके आवडले होते की, त्यांनी शेवटच्या श्वासापर्यंत आपली रिंगटोन हीच ठेवली. खरं तर, ते यात जुन्या जमान्यातील संगीताचा वापर करु पाहत होते, ते 22 वर्षांपूर्वीच्या घटनेवर आधारित होते. त्यांनी वेगवेगळ्या संगीतकारांसोबत बैठक केली. मात्र त्यांना ते जमले नाही. योगायोगाने मी त्याच वेळी कंपनीत सीईओ म्हणून काम करत होतो. मी त्यांना सांगितले, वडिलांनी काही नवीन कोरे, काढून टाकलेले डमी गाणे सोडून गेले आहेत. त्यानंतर यशजी आणि आदित्य चोप्रा यांनी ते संगीत आणि गाणी एेकली. त्यानंतर वीर जारामध्ये उस्ताद यांचीच गाणी घेण्याचा निर्णय झाला.
‘वीर-जारा’ माझे स्वप्न पूर्ण होण्यासारखे होते, स्वप्न सत्यात उतरेल याचा मी कधी विचारही केला नव्हता
संजीव कोहल पुढे सांगतात, वर्ष 2003 मधील घटना आहे. एक दिवस यशजींनी मला सांगितले, मी सहा वर्षांनंतर एक चित्रपट दिग्दर्शित करण्याचा निर्णय घेतला आहे, पण यात जुन्या जमान्यातील संगीताची आवश्यकता आहे, आजकाल पाश्चात्य संगीताचा जास्त प्रभाव आहे, मला हे संगीत नको तर जुने काही तरी वेगळे हवे आहे. तेव्हा माझ्या तोंडातून सहजपणे निघाले, माझ्याकडे जुन्या जमान्यातील काही टेप आहेत, परंतु मी 28 वर्षांपासून त्या ऐकल्या नाहीत. हे ऐकून ते उत्साही दिसू लागले आणि मी यापूर्वी कधीही हा उल्लेख केला नाही याचे त्यांना नवलही वाटले.
'वीर जारा'चे यश
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.