आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोरोनामुळे निर्मात्याचा मृत्यू:'राम जाने' चित्रपटाचे निर्माते प्रवेश सी. मेहरा यांचे निधन, एक महिन्यापासून कोविड -19 देत होते झुंज

7 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • बरीच वर्षे ते मिनर्वा थिएटरचे मालक होते.

शाहरुख खान स्टारर 'चमत्कार' (1992) आणि 'राम जाने' (1995) या चित्रपटाचे निर्माते प्रवेश सी. मेहरा यांचे निधन झाले आहे. ते मागील महिन्याभरापासून कोविड 19 शी झुंज देत होते. वृत्तानुसार शुक्रवारी संध्याकाळी चार वाजता त्यांनी मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला.

बरीच वर्षे मिनर्वा थिएटरचे होते मालक

प्रवेश सी मेहरा 71 वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात एक मुलगा आणि मुलीसह एक मोठी बहीण आणि तीन धाकटे भाऊ उमेश, राजेश आणि राजीव आहेत. ते बरीच वर्षे मुंबईतील प्रसिद्ध मिनर्वा थिएटरचे मालक होते. तिथे 1975 मधील सुपरहिट 'शोले' हा चित्रपट पाच वर्षे चालू होता.

या चित्रपटांची केली होती निर्मिती
'चमत्कारी' आणि 'राम जाने'शिवाय प्रवेश सी. मेहरा यांनी 'सलाखें' (1975), 'अशांती' (1982), 'आखिरी अदालत' (1988), 'शिकारी: द हंटर' (1991) आणि 'किला' (1998) या चित्रपटांची निर्मिती केली होती.

बातम्या आणखी आहेत...