आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जगातील तिसरा सर्वात श्रीमंत अभिनेता SRK चा वाढदिवस:इंदिरा गांधींची मैत्रीण होती शाहरुखची आई, वडील विकायचे चहा

एका महिन्यापूर्वी
 • कॉपी लिंक

2014 मध्ये अनुपम खेर यांनी त्यांच्या 'द अनुपम खेर शो : कुछ भी हो सकता है'मध्ये शाहरुख खानला विचारले होते की, तुझ्यानंतर एवढी प्रसिद्धी आणि नाव कोणाला मिळेल?

शाहरुखने हसून उत्तर दिले, मी बॉलिवूडचा शेवटचा स्टार आहे.

शाहरुखच्या म्हणण्याचा अर्थ होता की, त्याच्यानंतर इतका मोठा स्टार होणे नाही. काही अंशी हे खरेही आहे. 30 वर्षांच्या फिल्मी करिअरमध्ये शाहरुखने अनेक हिट चित्रपट दिले. आज आपला 57 वा वाढदिवस साजरा करत असलेला शाहरुख जगातील तिसरा सर्वात श्रीमंत फिल्मस्टार मानला जातो. त्याची एकूण संपत्ती 5100 कोटींहून अधिक आहे.

आजवर आपण शाहरुखच्या टीव्ही इंडस्ट्रीतील पदार्पणानंतर त्याचे आयुष्य कसे बदलले हे जाणून घेतले. पण आज आम्ही तुम्हाला त्याचा दिल्ली ते मुंबईपर्यंतचा प्रवास कसा झाला, याविषयी सांगत आहोत. शाहरुखची आई लतीफ फातिमा या मॅजिस्ट्रेट होत्या हे फार लोकांना ठाऊक नसेल. त्या त्यांच्या काळातील सर्वात यशस्वी मुस्लिम महिलांपैकी एक होत्या. सामाजिक कार्यात त्या अग्रेसर होत्या आणि माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्याशी त्यांचे जवळचे नाते होते. तर वडील मीर ताज हे पेशावरहून दिल्लीत स्थायिक झाले होते आणि येथे ते चहा विकायचे. एका अपघाताने मीर ताज आणि लतीफ फातिमा यांना एकत्र आणले. त्यांचे लग्न झाले आणि मग कहाणी सुरू झाली शाहरुख खान नावाचा स्टार बनण्याची...

चला तर मग आज वाचा शाहरुख खानच्या आयुष्याशी संबंधित न ऐकलेले किस्से...

 • वडील मीर ताज यांना अनेक भाषा अवगत होत्या

शाहरुखचे वडील मीर ताज मोहम्मद 6'2 उंचीचे देखणे पेशावरचे एक पठाण होते. ते स्वातंत्र्यलढ्यातील तरुण स्वातंत्र्यसैनिकांपैकी एक होते. मीर ताज यांचा सेन्स ऑफ ह्युमर जबरदस्त होता. त्यांनी M.A., LL.B चे शिक्षण घेतले होते. त्यांना पर्शियन, संस्कृत, पश्तो, पंजाबी, हिंदी, इंग्रजी अशा अनेक भाषा अवगत होत्या. ते वकील होते, पण वकिलीत अपयशी ठरल्यानंतर त्यांनी फर्निचरचा व्यवसाय, वाहतूक, रॉकेलचा असे विविध व्यवसाय केले. भारत आणि पाकिस्तानच्या फाळणीनंतर मीर ताज कुटुंबासोबत दिल्लीत स्थायिक झाले, जिथे त्यांचे विलिंगन हॉस्पिटलच्या मागे चहाचे दुकान होते.

 • फिल्मी आहे शाहरुखच्या आईवडिलांची लव्ह स्टोरी

एके दिवशी मीर ताज आपल्या मित्रांसोबत इंडिया गेट, दिल्ली येथे फिरायला गेले होते. तिथे त्यांनी एका कारचा अपघात झाल्याचे पाहिले. कार उलटी पडलेली होती, त्यात लतीफ फातिमा, त्यांच्या बहिणी आणि वडील होते. चालक कार सोडून पळून गेला होता अणि सर्व जण जखमी अवस्थेत पडले होते. मीर ताज यांनी आपल्या मित्राच्या मदतीने ती गाडी सरळ केली. रक्ताची गरज असल्याने मीर ताज यांनी रक्तगट जुळल्यावर स्वतः लतीफ यांना रक्त दिले. त्यानंतर त्यांची लतीफ फातिमा यांच्या कुटुंबाशी मैत्री झाली आणि त्यांचे घरी येणेजाणे सुरु झाले.

एके दिवशी मीर ताज लतीफ फातिमा यांच्या घरी पोहोचले. तेव्हा फातिमा यांच्या वडिलांनी विचारले- आमच्या धाकट्या मुलीशी लग्न करशील का? मीर ताज म्हणाले - नाही, मी मोठ्या बहिणीशी लग्न करेन, जिला मी रक्त दिले आहे. त्यावेळी लतीफ फातिमा यांचे लग्न क्रिकेटपटू अब्बास अली बेगशी झाले होते, जे मोडून त्यांनी मीर ताजशी लग्न केले. मीर ताज यांनी 1959 मध्ये 11 वर्षांनी लहान लतीफ फातिमाशी लग्न केले. एका वर्षानंतर त्यांच्या घरी मुलीचा जन्म झाला आणि त्यानंतर 1965 मध्ये शाहरुख खानचा जन्म झाला.

 • शाहरुखची आई लतीफ फातिमा या इंदिरा गांधी यांच्या निकटवर्तीय होत्या

शाहरुख खानची आई लतीफ फातिमा मुळच्या हैदराबादच्या होत्या. त्या खुल्या विचारांच्या होत्या. त्यांनी इंग्लंडमधील ऑक्सफर्ड विद्यापीठातून शिक्षण घेतले होते. त्या त्यांच्या काळातील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी होत्या, त्या समाजसेवेही अग्रेसर होत्या. लतीफ फातिमा माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या जवळच्या होत्या आणि त्यांच्यासोबत काम करत होत्या.

 • शाहरुखला लहानपणी तुरुंगवास भोगावा लागला होता

शाहरुख खानचे कुटुंब दिल्लीतील राजेंद्र नगरमध्ये भाड्याच्या घरात राहायचे. आई-वडील रॉकेलची एजन्सी चालवायचे. एकदा शाहरुखला रॉकेलच्या अवैध व्यवहाराप्रकरणी अटकही झाली होती. मात्र, त्याला लगेच जामीन मिळाला होता.

 • शाहरुखला व्हायचे होते खेळाडू, पण खांद्याच्या दुखापतीने स्वप्न भंगले

सेंट कोलंबस स्कूलमध्ये शिकत असताना शाहरुखला खेळाची आवड निर्माण झाली. शाहरुख हॉकी आणि फुटबॉलमध्ये निष्णात होता. एके दिवशी खेळत असताना शाहरुखच्या खांद्यावर गंभीर दुखापत झाली. स्पोर्ट्समध्ये करिअर करण्याचे शाहरुखचे स्वप्न होते. मात्र, डॉक्टरांनी त्याला खेळापासून दूर राहण्याचा सल्ला दिला आहे.

हंसराज कॉलेजमध्ये इकॉनॉमिक्स शिकत असताना शाहरुखने अभ्यासापेक्षा नाटकाला जास्त महत्त्व द्यायला सुरुवात केली. शाहरुखने दिल्ली थिएटर ग्रुपमध्ये बॅरी जॉनकडून अभिनय शिकला. पुढे, शाहरुखने मास कम्युनिकेशनमध्ये पदव्युत्तर पदवी घेण्यासाठी जामिया मिलिया इस्लामियामध्ये प्रवेश घेतला, परंतु अभिनयात करिअर करण्यासाठी त्याने आपले शिक्षण अर्धवट सोडून नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामध्ये प्रवेश घेतला.

 • वडिलांसोबतची शेवटची आठवण: व्हॅनिला आइस्क्रीम

शाहरुखच्या वडिलांचे दिल्लीतील विलिंगन हॉस्पिटलच्या मागे एक छोटेसे चहाचे दुकान होते. 1981 मध्ये त्याचे वडील मीर ताज मोहम्मद यांचे कॅन्सरने निधन झाले होते. पण शाहरुखने अखेरच्या वेळी आपल्या वडिलांचा चेहरा पाहिला नव्हता.

शाहरुखने एका मुलाखतीत आपल्या वडिलांच्या शेवटच्या आठवणीविषयी सांगितले होते. शाहरुखने सांगितले, त्यांना कॅन्सर होता. त्यांच्यावर उपचार सुरु होते. त्यांना थोडे बरे वाटल्यानंतर आम्ही रुग्णालयातून त्यांना घरी आणले. घरी आल्यानंतर वडिलांनी व्हॅनिला आइस्क्रीम मागितली आणि मी त्यांना आइस्क्रीम दिली.

शाहरुख पुढे म्हणाला, "18 ऑक्टोबरची रात्र होती, मी झोपलो होतो. आईने येऊन मला उठवले आणि सांगितले की वडील हॉस्पिटलमध्ये आहेत. मला आठवतंय मी त्यांचे फक्त पाय पाहिले होते, त्यांचा चेहरा मी बघू शकलो नव्हतो. कारण त्यांच्या निधनाने मला खूप दुःख झाले होते. माझी त्यांच्याविषयीची शेवटची आठवण त्यांच्यासोबत व्हॅनिला आइस्क्रीमची आहे."

 • मरणासन्न आईला त्रास देताना म्हणाला होता - मी दारुडा होईन

10 वर्षांनंतर 1991 मध्ये आई लतीफ फातिमा यांचीही प्रकृती मधुमेहामुळे बिघडली. बत्रा हॉस्पिटलमध्ये दाखल फातिमा अखेरच्या घटका मोजत होत्या. मात्र शाहरुखमध्ये त्यांना भेटण्याची हिंमत होत नव्हती. शाहरुख खानने अनुपम खेर यांच्या शोमध्ये सांगितले होते, ज्यादिवशी आईचे निधन झाले होते, त्यादिवशी दिल्लीतील बत्रा हॉस्पिटलच्या पार्किंगमध्ये तो आईसाठी प्रार्थना करत होता. त्यावेळी त्याची आई आयसीयूत दाखल होती. शाहरुख आईला भेटायला आयसीयूत जात नव्हता. कारण त्याला कुणी तरी सांगितले होते, की जर आईसाठी प्रार्थना करत राहिलास, तर आईला काहीही होणार नाही.

शाहरुखने सांगितल्यानुसार, त्याला एका व्यक्तीने 100 वेळा दुआ मागण्यास सांगितली होती. पण त्याने 100 हून अधिक वेळा दुआ मागितली होती. तेव्हा अचानक डॉक्टर आले आणि शाहरुखला सांगितले की, तो त्याच्या आईला भेटायला आयसीयूत जाऊ शकतो. याचा अर्थ त्यावेळी त्याची आई शेवटच्या घटका मोजत होती. शाहरुखने सांगितले, "मला आयसीयूत जायचे नव्हते. कारण मला वाटत होते की, जर मी आईसाठी दुआ मागत राहिलो, तर तिला काहीही होणार नाही. पण मग बहीण आणि इतर लोकांनी मला आत जाणे गरजेचे आहे, असे सांगितले आणि मी आईला भेटायला गेलो."

 • आईसीयूत आईला त्रास देत होता शाहरुख

शाहरुखने अनुपम खेर यांच्या शोमध्ये पुढे सांगितले, "माझा एका गोष्टीवर विश्वास आहे, तो म्हणजे, जेव्हा व्यक्ती प्रत्येक गोष्टीने संतुष्ट असतो, तेव्हा हे जग सोडतो. जर असे नसेल, तर आईवडील आपल्या मुलांना सोडून जाऊ शकत नाहीत. जेव्हा मी आयसीयूत माझ्या आईच्या बाजुला बसलो, तेव्हा मी चुकीचे वागलो. मी तिला दुःख देत राहिलो. कारण मी विचार केला की, जर मी तिला संतुष्ट होऊ दिले नाही, तर ती मला सोडून जाणार नाही. मी तिच्याजवळ बसून म्हणालो, की मी माझ्या बहिणीची काळजी घेणार नाही. मी शिकणारही नाही आणि कामदेखील करणार नाही. मी दारु प्यायला लागेन... मी अशा मुर्ख गोष्टी तिथे करत होतो. जेणेकरुन तिला त्रास होईल आणि ती संतुष्ट होणार नाही... आणि आई मला म्हणेल, मी तुला सोडून जात नाहीये. पण ती संतुष्ट होती. तिला ठाऊक होते की, मी माझ्या बहिणीची चांगली काळजी घेईल आणि आयुष्यात चांगलं काहीतरी करेल."

 • शाहरुख खान बनला बहिणीचा आधार

शाहरुख खानची बहीण शहनाज लालारुख त्याच्यापेक्षा 6 वर्षांनी मोठी आहे. अभ्यासातही टॉपर असलेली शहनाज घरची लाडकी होती. शहनाजने मानसशास्त्रात पदव्युत्तर पदवी घेतली होती. शाहरुखच्या आईची इंदिरा गांधी यांच्याशी मैत्री होती, त्यानंतर शहनाजने इंदिरा गांधी मेमोरियलमध्ये अधिकारी म्हणूनही काम केले. शहनाज एक आनंदी मुलगी होती, परंतु तिच्या आईच्या मृत्यूनंतर ती डिप्रेशनमध्ये गेली. शाहरुखने तिची संपूर्ण जबाबदारी उचलली आणि आजही शहनाज शाहरुखसोबत त्याच्या बंगल्यात राहते. शाहरुखची बहीण अविवाहित आहे.

शाहरुखने हेमा मालिनी यांचा डायरेक्टोरिअल डेब्यू चित्रपट 'दिल आशना' साइन केला होता. पण चित्रपटासाठी हेमा यांची शाहरुख पहिली पसंती नव्हता, कारण त्यांना आपल्या डायरेक्टोरिअल डेब्यूमध्ये एखाद्या न्यू कमरला घेऊन धोका पत्करायचा नव्हता. त्यांना ना शाहरुखचे केस आवडले, ना त्याची बोलण्याची स्टाईल, पण जेव्हा त्यांना दुसरा हिरो मिळाला नाही, तेव्हा त्यांनी शाहरुखसोबत चित्रपट केला.

 • हेमा मालिनी यांनी लग्नाच्या दिवशीच त्याला शूटिंगवर बोलावले

ज्यावेळी शाहरुखचे लग्न झाले त्याचवेळी 'दिल आशना है' या चित्रपटाचे शूटिंग सुरू होते. शाहरुख लग्नाच्या वेळी मित्रांसोबत राहत असे, त्यामुळे लग्नानंतर त्याने हनिमूनसाठी हॉटेल बुक केले. हॉटेलमध्ये पोहोचताच हेमा मालिनी यांनी फोन करून शाहरुखला भेटायला बोलावले.

नववधूच्या वेशात असलेल्या गौरीसोबत शाहरुख सेटवर पोहोचला. हेमा तिथे हजर नव्हत्या. त्यामुळे शाहरुखने गौरीला मेकअप रूममध्ये सोडले आणि शूटिंगला सुरुवात केली. तासन्तास शाहरुख हेमा यांची वाट बघत राहिला तर गौरी शाहरुखची. रात्रीचे 2 वाजता शाहरुख मेकअप रूममध्ये पोहोचला तेव्हा नववधू गौरी झोपी गेली होती. शाहरुख येताच गौरी हसत हसत उठली, पण शाहरुखचे डोळे पाणावले होते. याची शाहरुखला नेहमीच खंत वाटते. त्यावेळी हेमा मालिनी यांनाही शाहरुखचे लग्न झाल्याचे माहीत नव्हते.

 • हेमा मालिनी यांच्या गुरू आईने शाहरुखचे भविष्य वर्तवले होते

हेमा मालिनी यांनी त्यांच्या बियॉन्ड द ड्रीम गर्ल या बायोग्राफीमध्ये शाहरुखला आपल्या चित्रपटात कास्ट केल्याने त्या समाधानी नव्हत्या असा उल्लेख केला आहे. शाहरुखच्या लूकवर आणि घाईत बोलण्याच्या स्टाइलवर त्यांचा आक्षेप होता. हेमा यांचा शाहरुखवर विश्वास नव्हता, पण कास्ट केल्यानंतर हेमा यांनी शाहरुखचा फोटो त्यांच्या गुरू आई इंदिरा यांना दाखवला आणि एक दिवस हा मुलगा इंडस्ट्रीचा चेहरामोहरा बदलून टाकेल, असे भाकीत त्यांनी केले होते.

 • वादग्रस्त कॉलम वाचल्यानंतर संपादकाला जीवे मारण्याची धमकी, तुरुंगात गेला

1993 साली शाहरुख 'माया मेमसाब' या चित्रपटात दिसला होता. चित्रपटातील रोमँटिक सीन बघून लोक डोळे मिटून घेत असत, या चित्रपटात बोल्ड सीनचा भडीमार होता. केतन मेहता या चित्रपटाचे दिग्दर्शक होते. त्यांची पत्नी दीपा साही हिने शाहरुखसोबत बोल्ड सीन्स दिले होते.

चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर, सिने ब्लिट्स नावाच्या मासिकाने एका कॉलममध्ये लिहिले होते की, दिग्दर्शक केतनच्या सांगण्यावरून शाहरुखने त्यांची पत्नी दीपासोबत एक रात्र घालवली होती, जेणेकरून दोघेही एकमेकांना चांगले समजून घेऊन रोमँटिक सीन शूट करू शकतील. हा कॉलम वाचल्यानंतर शाहरुखला इतका राग आला की, त्याने थेट मॅगझिनच्या ऑफिसमध्ये जाऊन लेखकाला जीवे मारण्याची धमकी दिली होती.

शाहरुखच्या या कृतीवर मासिकाच्या संपादकाने पोलिसांत तक्रार दाखल केली. जेव्हा पोलिस शाहरुखला पकडण्यासाठी सेटवर आले तेव्हा त्याला वाटले की, पोलिस त्याचे चाहते आहेत आणि त्याला भेटायला आले आहेत. शाहरुखने त्यांना कारमध्ये बसण्यास सांगितले. पण नंतर त्याला कळले की ते त्याला अटक करायला आले आहेत. तुरुंग पाहण्याची शाहरुखची ही पहिलीच वेळ होती. शाहरुखने एका मुलाखतीत सांगितले की, जेल खूप गलिच्छ ठिकाण होते. शाहरुखला दिवसभर तुरुंगात ठेवण्यात आले होते.

 • गौरी खानसाठी खरेदी केला होता मन्नत बंगला

शाहरुख खानचा बंगला काही वर्षांपूर्वी गुजराती वंशाचे पारशी किकू गांधी यांच्या मालकीचा होता. शिमोल्ड आर्ट गॅलरीचे ते संस्थापक होते. शाहरुख करिअरच्या सुरुवातीला किकू यांचा शेजारी होता. शाहरुखला जेव्हा कळले की, किकू त्यांचा बंगला लीजवर देणार आहेत, तेव्हा त्याने तो खरेदी करण्याचा प्रस्ताव त्यांच्यासमोर ठेवला. त्यावेळी शाहरुख 'येस बॉस' या चित्रपटाचे शूटिंग करत होता. अनेक अडचणींनंतर शाहरुखने गौरीसाठी हे घर 2001 मध्ये 13.32 कोटी रुपयांना खरेदी केले होते. पूर्वी या बंगल्याचे नाव व्हिला व्हिएन्ना होते, ज्याचे शाहरुखने नंतर मन्नत असे ठेवले.

 • बॉलिवूडचा खरा बादशाह आहे शाहरुख

5116 कोटी रुपयांच्या संपत्तीसह शाहरुख जगातील तिसरा सर्वात श्रीमंत अभिनेता आहे. या यादीत अमिताभ बच्चन आठव्या क्रमांकावर आहेत. 2021 मध्ये शाहरुखची एकूण संपत्ती 5116 कोटी रुपये होती.

शाहरुखचे घर 'मन्नत'ची मार्केट व्हॅल्यू 350 कोटी रुपये आहे. शाहरुखने 2009 मध्ये लंडनमध्ये 172 कोटींना एक आलिशान घर खरेदी केले होते. शाहरुखचा दुबईजवळील पाम जुमेराह येथे 100 कोटींचा लक्झरी व्हिला आहे. जन्नत असे या व्हिलाचे नाव आहे. हा व्हिला शाहरुखला दुबईस्थित प्रॉपर्टी डेव्हलपर नखिलने सप्टेंबर 2007 मध्ये भेट म्हणून दिला होता.

 • अभिनयाव्यतिरिक्त शाहरुख या 4 व्यवसायातून पैसे कमावतो

रेड चिलीज एंटरटेन्मेंट प्रॉडक्शन हाऊस

वर्ष - 2000 पासून

वार्षिक व्यवसाय - 500 कोटी रुपये

आयपीएल टीम कोलकाता नाइट रायडर

वर्ष 2008 पासून

किडजानिया- शाहरुखचे या कंपनीत 26% शेअर्स आहेत

ब्रँड एंडोर्समेंट

शाहरुखची ब्रँड व्हॅल्यू 378 कोटी रुपये आहे.

जाहिरात फी – 4 कोटी रुपये (शाहरुखकडे सध्या 40 ब्रँड्स आहेत)

 • शाहरुख खान मैत्रीतही बादशाह आहे

प्यार दोस्ती है.. हा डायलॉग शाहरुख खानचा आहे... आणि हा डायलॉग तो मनापासून फॉलो करतो. करण जोहर, काजोल, जुही चावला, फराह खान हे शाहरुखच्या बेस्ट फ्रेंडशिपचा पुरावा आहेत. काजोल आणि शाहरुखची मैत्री 1993 मध्ये आलेल्या 'बाजीगर' चित्रपटापासून सुरू झाली जी आजही कायम आहे. प्रदीर्घ मैत्रीमध्ये, दोघांच्या नात्यात कधीही संशयला जागा नव्हती. या जोडीने एकत्र येऊन इंडस्ट्रीला बाजीगर, दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे, कुछ कुछ होता है, कभी खुशी कभी गम, करण अर्जुन यांसारखे उत्कृष्ट चित्रपट दिले.

जुही चावला आणि शाहरुखची मैत्री 1992 पासून कायम आहे. दोघेही आयपीएल टीम कोलकाता नाईट रायडर्सचे सह-मालक आहेत. आर्यनला ड्रग्ज प्रकरणात अटक झाली तेव्हा जुहीने त्याचे जामीनपत्र भरले होते.

शाहरुख खानने फराह खानला दिलेले वचन पाळत तिच्या 'हॅपी न्यू इयर'मध्ये मुख्य भूमिका साकारली होती. मात्र फराहचा पती शिरीष कुंदरला थप्पड मारल्याने त्यांच्या मैत्रीत दुरावा निर्माण झाला होता. पण आता तोही संपला आहे.

करण जोहर आणि शाहरुख खान यांची मैत्रीही जगजाहीर आहे. वृत्तानुसार, करणच शाहरुखचा मुलगा आर्यनला बॉलिवूडमध्ये लाँच करणार आहे.

हेही वाचा...

बातम्या आणखी आहेत...