आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिग्गजांना किंग खानने पछाडले:टाइम रीडर पोलमध्ये शाहरुख खान अव्वल, दुसऱ्या स्थानावर हिजाबला विरोध करणाऱ्या इराणी महिला

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

अनेक दिग्गज व्यक्तिमत्त्वांना मागे टाकत बॉलिवूडचा किंग शाहरुख खान टाइम मॅगझिनच्या वाचकांच्या सर्वेक्षणात अव्वल ठरला आहे. शाहरुख खानला सर्वात प्रभावशाली व्यक्तिमत्व (मोस्ट इन्फ्लूएंशल पर्सनॅलिटी) म्हणून निवडण्यात आले आहे. टाइम 100 पोलमध्ये आघाडीवर असलेल्या शाहरुखला 4% मते मिळाली आहे. दुसऱ्या क्रमांकावर हिजाबच्या विरोधात निदर्शने करणाऱ्या इराणी महिला आहेत.

या यादीत जगभरातील कोविड आरोग्य कर्मचारी तिसऱ्या क्रमांकावर आहेत. तर ब्रिटनचे प्रिन्स हॅरी आणि त्यांची पत्नी मेघन चौथ्या व फुटबॉलपटू मेस्सी पाचव्या क्रमांकावर आहेत.

57 वर्षीय शाहरुख खानचा 'पठान' हा चित्रपट जानेवारीत रिलीज झाला होता. या ब्लॉकबस्टर चित्रपटाने कमाईचे अनेक विक्रम मोडले.
57 वर्षीय शाहरुख खानचा 'पठान' हा चित्रपट जानेवारीत रिलीज झाला होता. या ब्लॉकबस्टर चित्रपटाने कमाईचे अनेक विक्रम मोडले.

इराणी महिलांना मिळाली 3% मते
टाइम मॅगझिननुसार, जगभरातून 1.2 मिलियन लोकांनी यासाठी मतदान केले. या पोलमध्ये शाहरुखला सर्वाधिक 4% मते मिळाली. बुरख्याला विरोध करणाऱ्या इराणी महिलांना 3% मतांसह दुसऱ्या स्थानावर राहिल्या. इराणी महिलांना मासिकाचा 2022 सालचा पर्सन ऑफ द इयर हा किताबही मिळाला आहे.

प्रिन्स हॅरी आणि मेघन चौथ्या क्रमांकावर
चौथ्या क्रमांकावर प्रिन्स हॅरी आणि मेघन आहेत, ज्यांना वाचकांकडून 1.9% मते मिळाली. हॅरी यांनी यावर्षी त्यांची बायोग्राफी स्पेयरमुळे चर्टेत राहिले. तर मेघन यांनी आर्किटाइप्स नावाचे पॉडकास्ट होस्ट केले. याच कारणामुळे राजघराण्यातील दोन्ही सदस्य प्रसिद्धीझोतात राहिले. फुटबॉलपटू लिओनेल मेस्सी 1.8% मतांसह यादीत पाचव्या स्थानावर आहे.

6 एप्रिल 2023 रोजी टाइम स्टाफने या यादीत शाहरुख खान आघाडीवर असल्याची माहिती दिली.
6 एप्रिल 2023 रोजी टाइम स्टाफने या यादीत शाहरुख खान आघाडीवर असल्याची माहिती दिली.

टॉप 5 प्रभावशाली व्यक्ती

सिरीअल नंबरनावमतं %
1शाहरुख खान4%
2इराणी महिला3%
3कोविड हेल्थ वर्कर्स2%
4प्रिन्स हॅरी-मेघन मार्कल1.9%
5लियोनेल मेस्सी1.8%

13 एप्रिल रोजी जाहीर होणार अंतिम यादी
Time.com नुसार, 2023 मधील सर्वात प्रभावशाली व्यक्तींची वार्षिक यादी या महिन्याच्या 13 तारखेला प्रसिद्ध केली जाईल. 2022 मध्ये या यादीत गौतम अदानी, करुणा नंदी आणि खुर्रम परवेझ यांसारख्या सेलिब्रिटींची नावे समाविष्ट होती.