आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बिग अपडेट!:'डंकी'मधील शाहरुख खानच्या भूमिकेवरुन उचलण्यात आला पडदा, पुन्हा एकदा आर्मी ऑफिसरच्या भूमिकेत दिसणार

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूडचा सुपरस्टार शाहरुख खानने तब्बल चार वर्षांच्या ब्रेकनंतर 'पठाण' या चित्रपटाद्वारे दमदार पुनरागमन केले आहे. या चित्रपटाने जगभरात एक हजार कोटींहून अधिकचा व्यवसाय करत विक्रम रचला. 'पठाण'नंतर आता चाहते शाहरुखच्या आगामी चित्रपटांची आतुरतेने वाट पाहात आहेत. येत्या काळात हा अभिनेता राजकुमार हिराणी यांच्या 'डंकी' आणि एटली यांच्या 'जवान' या चित्रपटांमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. शिवाय यशराज फिल्म्सच्या आगामी 'टायगर वर्सेस पठाण' या चित्रपटाची देखील घोषणा झाली आहे. या चित्रपटात शाहरुख आणि सलमान एकत्र झळकणार आहेत. दरम्यान शाहरुखच्या 'डंकी' या चित्रपटाबाबतची एक मोठी अपडेट समोर आली आहे.

'डंकी'मध्ये शाहरुख साकारणार आर्मी ऑफिसरची भूमिका शाहरुख 'डंकी' या चित्रपटातून पहिल्यांदाच राजकुमार हिराणी यांच्यासोबत काम करतोय. या चित्रपटाबाबत एक नवी माहिती समोर आली आहे. ते म्हणजे या चित्रपटात शाहरुख आर्मी ऑफिसरच्या भूमिकेत दिसणार आहे. अलीकडेच सौदी अरेबियातील रेड सी इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलमध्ये शाहरुख सहभागी झाला होता. येथे त्याने डंकी या चित्रपटाबाबत काही खुलासे केले होते. या चित्रपटाबद्दल शाहरुख खानने सांगितले होते की, "डंकीची कथा अशा लोकांवर आधारित आहे, ज्यांना आपल्या मायदेशी परतायचे आहे."

शाहरुख पुढे म्हणाला होता, "डंकी चित्रपटाचे दिग्दर्शन देशातील सर्वात हुशार दिग्दर्शकांपैकी एक असलेले राजू हिरानी यांनी केले आहे. या चित्रपटाची कथा अभिजित जोशी यांची आहे. ही कथा परदेशात असलेल्या व्यक्तींची कथा चित्रित करते. त्यांना घरातील काही खास व्यक्तींचा फोन आल्यावर घरी जाण्याची इच्छा होते," असे शाहरुखने सांगितले होते.

सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, शाहरुख पुन्हा एकदा वर्दी परिधान करण्यासाठी खूप उत्सुक आहे. या चित्रपटाच्या घोषणेवेळी एक व्हिडिओ शेअर करण्यात आला होता. त्यात शाहरुखच्या पँटपासून टी-शर्टपर्यंतच्या लूकवरून तो एका लष्कर अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसेल असे समजते.

यापूर्वीही स्क्रीनवर वर्दीत दिसला होता शाहरुख
याआधी शाहरुख खानने पडद्यावर अनेकदा वर्दी परिधान केली आहे. 'फौजी', 'मैं हूं ना' आणि 'जब तक है जान' यांसारख्या चित्रपटात तो वर्दीत पाहायला मिळाला होता.

पहिल्यांदाच एकत्र काम करत आहेत शाहरुख-राजकुमार
शाहरुख खान आणि राजकुमार हिराणी यांचा एकत्र असलेला हा पहिलाच चित्रपट आहे. हा चित्रपट जिओ स्टुडिओ, रेड चिलीज एंटरटेनमेंट आणि राजकुमार हिरानी फिल्म्स संयुक्तपणे प्रेझेंट करणार आहेत. या चित्रपटात शाहरुख खानसोबत तापसी पन्नू मुख्य भूमिकेत दिसणार आहे. चित्रपटाचे लेखन राजकुमार हिराणी, ​​अभिजात जोशी आणि कनिका धिल्लन यांनी केले आहे. यावर्षी ख्रिसमसच्या काळात म्हणजे 22 डिसेंबर 2023 रोजी हा चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.