आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शाहरुख खान नोव्हेंबरमध्ये नवीन चित्रपटाला करणार सुरुवात:'झिरो'च्या 1500 दिवसांनंतर शाहरुखच्या नवीन चित्रपटाची घोषणा, चित्रपटात SRK सोबत झळकणार दीपिका आणि जॉन

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • ऑगस्ट 2016 मध्ये शाहरुखच्या 'झिरो' या चित्रपटाची घोषणा झाली होती.

दोन वर्षांच्या विश्रांतीनंतर अभिनेता शाहरुख खान नोव्हेंबरमध्ये 'पठाण' या आगामी चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात करणार आहे. वृत्तानुसार यशराज फिल्म्स 2 नोव्हेंबर रोजी शाहरुख खानच्या वाढदिवशी चित्रपटाची घोषणा करणार आहे. असे झाल्यास, तब्बल 1500 दिवसानंतर शाहरुखच्या नवीन चित्रपटाची घोषणा होईल. यापूर्वी ऑगस्ट 2016 मध्ये त्याच्या 'झिरो' या चित्रपटाची घोषणा झाली होती.

  • 870 दिवसांनी शूटिंग सेटवर परतणार शाहरुख

बॉलिवूड हंगामाच्या वृत्तानुसार, शाहरुखने जून 2018 मध्ये त्याची प्रमुख भूमिका असलेल्या 'झिरो' चित्रपटाचे शूटिंग पूर्ण केले होते. त्यानुसार, आता सुमारे 870 दिवसांनी तो नवीन चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात करणार आहे.

  • या चित्रपटात जॉन-दीपिकादेखील दिसणार आहेत

वृत्तानुसार, जॉन अब्राहम आणि दीपिका पदुकोण यांच्या देखील या चित्रपटात महत्वाच्या भूमिका आहेत. दोघेही जानेवारी 2021 मध्ये चित्रीकरणाला सुरुवात करतील. या दोघांचा एकत्र असलेला हा पहिला चित्रपट असेल. या चित्रपटातील अ‍ॅक्शन सीक्वेन्सने अॅक्शन डायरेक्टर परवेज शेख यांना नियुक्त करण्यात आले आहे. त्यांनी याूपर्वी 'वॉर', 'ब्रह्मास्त्र' आणि 'बेलबॉटम' सारख्या चित्रपटांमधील अ‍ॅक्शन सीन्स कोरिओग्राफ केले आहेत.

  • दोन महिन्यांचे असेल पहिले शेड्युल

या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा सिद्धार्थ आनंद यांच्यावर सोपवण्यात आली आहे. चित्रपटाचे शूटिंग यशराज फिल्म्स स्टुडिओमध्ये सुरू होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. माध्यमांतील वृत्तानुसार, चित्रपटाचे पहिले शेड्युल दोन महिन्यांचे असेल. यात संपूर्णपणे शाहरुखच्या सीन्सवर लक्ष केंद्रित करण्यात येणार आहे. सिद्धार्थ आनंदच्या यापूर्वीच्या 'वॉर' या चित्रपटाप्रमाणे हा चित्रपटदेखील एक रिव्हेंज ड्राम असेल. चित्रपट पुढील वर्षी ऑक्टोबर किंवा जानेवारी 2022 मध्ये प्रदर्शित होईल.

बातम्या आणखी आहेत...