आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

लॉकडाऊन विचार:शाहरुख खानला भेडसावतेय भटक्या प्राण्यांची चिंता, चाहत्यांना केले आवाहन - 'या कठीण काळात मुक्या प्राण्यांचे रक्षण करायला विसरू नका'

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • एका स्वयंसेवी संस्थेची लिंकही शाहरुखने शेअर केली.

कोरोनाव्हायरसमुळे मुक्या प्राण्यांचेही हाल होत आहेत. कोरोना त्यांच्याद्वारे पसरलेल की काय, या भीतीमुळे लोक त्यांना रस्त्यावर सोडत आहेत. रस्त्यावर भटकणा-या या प्राण्यांवर लॉकडाऊनमुळे खाण्या-पिण्याचे संकट उभे राहिले आहे. अशा परिस्थितीत अभिनेता शाहरुख खानने सोशल मीडियावर चाहत्यांना आणि फॉलोअर्सना या कठीण काळात असहाय्य प्राण्यांचे संरक्षण करण्याचे आवाहन केले आहे.

  • शाहरुखने मदतीचे केले आवाहन केले

शाहरुखने ट्विटरवर लिहिले की, 'सध्या संपूर्ण जग कोविड -19 बरोबर झगडत आहे. या काळात मुक्या प्राण्यांकडे दुर्लक्ष करु नका. निराधार प्राण्यांना यावेळी सर्वात जास्त प्रेम आणि काळजी मिळेल याची खात्री करुन घेऊया.' अशा प्राण्यांची काळजी घेणार्‍या एका स्वयंसेवी संस्थेची लिंकही शाहरुखने शेअर केली आणि चाहत्यांना या स्वयंसेवी संस्थेला मदत करण्याचे आवाहनही केले आहे.

  • कोरोना लढ्यात वेळोवेळी करतोय मदत

कोरोनाव्हायरस विरूद्ध लढ्यात मदतीसाठी शाहरुखने महाराष्ट्र शासनाला 25000 वैयक्तिक संरक्षक उपकरणे (पीपीई) किट उपलब्ध करुन दिली आहेत. जेणेकरून राज्यभरातील मेडिकल टीमची सुरक्षा होऊ शकेल. यापूर्वीही, शाहरुख आणि त्याची पत्नी गौरी यांनी वांद्रे येथील त्यांची चार मजली कार्यालयीन इमारत विलगीकरणासाठी मुंबई महापालिकेला दिली आहे. शाहरुख आणि गौरीने मदतीचा हात पुढे केल्याने महापालिकेने त्यांचे विशेष आभार मानले होते. याशिवाय शाहरुखने आपल्या कंपन्या कोलकाता नाइट रायडर, रेड चिलीज एंटरटेनमेंट, मीर फाऊंडेशन आणि रेड चिल्लीज VFX कडून सात संस्थांना निधी देत असल्याचे जाहीर केले होते. याशिवाय 50 हजार पीपीई किट्ससाठी सरकारला निधी, मुंबईतील 5500 कुटुंबाना तसंच 10 हजार लोकांना जेवण, रुग्णालयांसाठी 2000 जणांचं जेवण, दिल्लीतील 2500 रोजंदारी कामगार आणि 100 अ‍ॅसिड हल्ला पीडितांना किराणा सामान इतकी मदत शाहरुखने जाहीर केली आहे.

बातम्या आणखी आहेत...