आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासुपरस्टार शाहरुख खानने नुकतेच माँ वैष्णोदेवी मंदिराला भेट दिली. दर्शनाला जाताना चेहरा दिसू नये म्हणून शाहरुखने हुडीने चेहरा झाकला होता. आता त्याचा एक फोटो समोर आला आहे, ज्यामध्ये तो कपाळावर टिळा लावलेला दिसत आहे. शाहरुखचा हा फोटो वैष्णोदेवीच्या दर्शनानंतर काढण्यात आल्याचे बोलले जात आहे.
शाहरुखने चाहत्यांसोबत दिली पोझ
या फोटोंमध्ये शाहरुख चाहत्यांसोबत पोज देताना दिसत आहे. यादरम्यान थंडीपासून बचावासाठी त्याने उबदार कपडे आणि टोपी घातलेली आहे. आता हा फोटो पाहिल्यानंतर काही लोक शाहरुखचे कौतुक करत आहेत, तर काहींनी मात्र तो चित्रपटाच्या प्रमोशनसाठी नाटक करत असल्याची टीका केली आहे. काहींच्या मते, शाहरुख सच्चा भारतीय असून सर्व धर्मांचा आदर करतो. तर काहींनी 'पठाण' या आगामी चित्रपटाच्या प्रमोशनसाठी तो स्वतःला हिंदू असल्याचे भासवत असल्याचे म्हटले आहे.
'पठाण'च्या यशासाठी प्रार्थना करायला वैष्णोदेवीला पोहोचला होता शाहरुख
शाहरुख खानने रविवारी (11 डिसेंबर) माँ वैष्णोदेवीचे दर्शन घेतले. तो त्याच्या आगामी 'पठाण' या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी पोहोचल्याचे बोलले जात आहे. यानंतर त्याने वैष्णोदेवी मंदिराला भेट देऊन चित्रपटाच्या यशासाठी देवीला साकडे घातले.
शाहरुख मक्केत उमराह करण्यासाठी गेला होता
शाहरुख खान काही दिवसांपूर्वी 'डंकी' चित्रपटाचे शूटिंग पूर्ण करून मक्का येथे पोहोचला होता. शाहरुखने तेथे उमराह (प्रार्थना) केला होता. हा फोटो शेअर करत सौदी अरेबियातील एका पत्रकाराने शाहरुखने मक्का गाठल्यानंतर उमराह केल्याची पुष्टी केली होती. यावेळी तो पांढऱ्या कपड्यात दिसला होता.
उमराहनंतर वैष्णोदेवींच्या दर्शनाला गेलेल्या शाहरुखचे सोशल मीडियावर व्हिडिओ आणि फोटो शेअर झाले. यामध्ये तो सुरक्षेने वेढलेला दिसला. सोबतच त्याच्या वाहनांचा ताफा दिसला. मात्र यावेळी त्याने स्वत:चा चेहरा दिसणार नाही याची पूर्ण काळजी घेतली होती.
जानेवारी 2023 मध्ये रिलीज होणार 'पठाण'
शाहरुख खानचा 'पठाण' चित्रपट पुढील महिन्यात म्हणजेच जानेवारी 2023 मध्ये रिलीज होणार आहे. शाहरुख शेवटचा झिरो या चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसला होता. त्यानंतर तो चित्रपटांमध्ये छोटेखानी भूमिकांमध्येच दिसला. आता चार वर्षांनंतर तो कमबॅक करतोय. या चित्रपटात शाहरुखसह दीपिका पदुकोण आणि जॉन अब्राहम मुख्य भूमिकेत आहेत. हिंदीसह हा चित्रपट तामिळ आणि तेलुगू भाषेत रिलीज होणार आहे. मधल्या काळात शाहरुख 'ब्रह्मास्त्र' आणि 'रॉकेट्री' या चित्रपटांमध्ये कॅमिओमध्ये दिसला होता.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.