आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आधी उमराह आता वैष्णोदेवीच्या दरबारी:'पठाण'साठी प्रार्थना करायला वैष्णोदेवीला पोहोचला शाहरुख खान

3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

अभिनेता शाहरुख खानने रविवारी माँ वैष्णोदेवीचे दर्शन घेतले. तो त्याच्या आगामी 'पठाण' या चित्रपटाच्या यशासाठी प्रार्थना करण्यासाठी येथे पोहोचला होता, असे म्हटले जात आहे. सोशल मीडियावर समोर आलेल्या व्हिडिओंमध्ये शाहरुखचा चेहरा दिसत नाहीये. त्याने काळ्या रंगाचे जॅकेट, डोक्यावर हुड आणि चेहऱ्यावर मास्क घातलेला दिसतोय.

शाहरुखही मक्केत उमराह करण्यासाठी गेला होता
शाहरुख खान काही दिवसांपूर्वी 'डंकी' चित्रपटाचे शूटिंग पूर्ण करून मक्केला पोहोचला होता. शाहरुखने तेथे उमराह (प्रार्थना) केला होता. हा फोटो शेअर करत सौदी अरेबियातील एका पत्रकाराने शाहरुखने मक्का गाठल्यानंतर उमराह केल्याची पुष्टी केली होती. यावेळी तो पांढऱ्या कपड्यात दिसला होता.

उमराहनंतर वैष्णोदेवींच्या दर्शनाला गेलेल्या शाहरुखचे सोशल मीडियावर व्हिडिओ आणि फोटो शेअर होत आहेत. यामध्ये तो सुरक्षेने वेढलेला दिसतोय. सोबतच त्याच्या वाहनांचा ताफा दिसतोय. मात्र यावेळी त्याने स्वत:चा चेहरा दिसणार नाही याची पूर्ण काळजी घेतली आहे.

शाहरुख खानचा 'पठाण' चित्रपट पुढील महिन्यात म्हणजेच जानेवारी 2023 मध्ये रिलीज होणार आहे. शाहरुख शेवटचा झिरो या चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसला होता. त्यानंतर तो चित्रपटांमध्ये छोटेखानी भूमिकांमध्येच दिसला. आता चार वर्षांनंतर तो कमबॅक करतोय. चित्रपटाला यश मिळावे, अशीच प्रार्थना त्याने वैष्णोदेवीच्या दरबारी केली.

उमराह दरम्यान शाहरुख खानचे छायाचित्रे.
उमराह दरम्यान शाहरुख खानचे छायाचित्रे.

आमिरने ऑफिसमध्ये केले होते कलश पूजन, झाला होता ट्रोल
आमिर खानने अलीकडेच आपल्या ऑफिसमध्ये हिंदू पद्धतीने कलश पूजन केले होते. यावेळी त्याच्यासोबत त्याची पुर्वाश्रमीची पत्नी किरण रावही उपस्थित होती. पूजेचे फोटो समोर आल्यानंतर सोशल मीडिया यूजर्सनी त्यांना ट्रोल करण्यास सुरुवात केली होती. एका नेटक-याने लिहिले होते की, चित्रपट अपयशी ठरु लागल्यानंतर तो हिंदू असल्याचे भासवतोय.

हा फोटो मुंबईचा आहे. येथे त्याने त्याच्या ऑफिसमध्ये कलश पूजन केले.
हा फोटो मुंबईचा आहे. येथे त्याने त्याच्या ऑफिसमध्ये कलश पूजन केले.
आमिर आणि किरण राव यांनी एकत्र आरती केली.
आमिर आणि किरण राव यांनी एकत्र आरती केली.
बातम्या आणखी आहेत...