आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शाहरुख खानने पूर्ण केले 'डंकी'चे चित्रीकरण:व्हिडिओ शेअर करून सौदीच्या सांस्कृतिक मंत्रालयाचे मानले आभार

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शाहरुख खानचे चाहते त्याच्या आगामी 'डंकी' या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. दिग्दर्शक राजकुमार हिराणी यांच्या या चित्रपटाचे चित्रीकरण सौदी अरेबियात सुरू होते. आता हे शेड्युल पूर्ण करण्यात आले आहे. याबाबतचा एक व्हिडिओ शाहरुखने त्याच्या इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये किंग खान सौदीतील एका लोकेशनवर दिसत आहे, जिथे एक मोठे मैदान आणि डोंगर दिसत आहेत. व्हिडिओच्या सुरुवातीला सौदीचे लोकेशन दिसत आहे, त्यानंतर ब्लॅक कोट आणि गॉगलमध्ये एन्ट्री घेत शाहरुख म्हणतो, "सौदीमध्ये डंकीसारख्या चित्रपटाचे शूटिंग शेड्यूल पूर्ण करणे ही एक चांगली फिलींग आहे. आम्हाला एक उत्तम स्थान आणि अद्भुत आदरातिथ्य दिल्याबद्दल धन्यवाद. मी राज सर आणि संपूर्ण कलाकार, क्रू यांना मोठे शुक्रान (धन्यवाद) म्हणतो. देव कायम तुमच्या पाठीशी राहो." शाहरुखने व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिले की, 'सौदी अरेबियाचे सांस्कृतिक मंत्रालय, टीम आणि डंकीच्या शूटमध्ये मदत करणाऱ्या सर्वांचे खूप खूप आभार.'

'डंकी' पुढच्या वर्षी रिलीज होणार आहे
शाहरुख खान पहिल्यांदाच दिग्दर्शक राजकुमार हिराणींसोबत काम करत आहे. 'डंकी'मध्ये शाहरुखसोबत बोमन इराणी, तापसी पन्नू आणि विकी कौशल महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत आणि हा चित्रपट पुढच्या वर्षी डिसेंबर 2023 मध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात बेकायदेशीरपणे यूएस आणि कॅनडामध्ये जाणाऱ्या भारतीयांच्या कथेवर प्रकाश टाकण्यात येणार आहे, ज्याला 'डंकी फ्लाइट' म्हटले जाते.

बातम्या आणखी आहेत...