आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हॅपी बर्थडे किंग खान:मध्यरात्री चाहत्यांची ‘मन्नत’बाहेर तुफान गर्दी, अबरामसोबत फॅन्सना भेटला शाहरुख

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूडचा किंग खान म्हणजेच शाहरुखचा आज वाढदिवस असून त्याने वयाची 57 वर्षे पू्र्ण केली आहेत. यानिमित्ताने सेलिब्रिटींपासून ते सामान्यांपर्यंत सर्वजण त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत. दरवर्षी वाढदिवसाच्या पुर्वसंध्येला शाहरुखच्या ‘मन्नत’ या बंगल्याबाहेर चाहत्यांची तुफान गर्दी जमते. यावर्षीही शाहरुख खानचे चाहते मध्यरात्री आपल्या लाडक्या अभिनेत्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी जमले होते. चाहत्यांनी शाहरुखासाठी फुले, भेटवस्तू आणल्या होत्या. तर काहीजण शाहरुखचे पोस्टर घेऊन तिथे पोहोचले होते. शाहरुखनेही आपल्या चाहत्यांचा हिरमोड केला नाही आणि त्याने नेहमीप्रमाणे बाल्कनीत येऊन त्याने चाहत्यांना अभिवादन केलं. यावेळी त्याचा धाकटा मुलगा अबरामही त्याच्यासोबत होता. यावेळी शाहरुखने त्याची सिग्नेचर पोज देत चाहत्यांचे प्रेम स्वीकारले.

सध्या शाहरुख त्याच्या आगामी चित्रपटांच्या चित्रीकरणात बिझी आहे. ‘जवान’, ‘पठाण’, ‘डंकी’ हे त्याचे आगामी चित्रपट आहेत. झिरो या चित्रपटानंतर शाहरुख मोठ्या पडद्यावर दिसला नव्हता. त्यामुळे त्याचे चाहते त्याला पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर बघण्यासाठी अतिशय उत्सुक आहेत. पाहा व्हिडिओ...

बातम्या आणखी आहेत...