आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

शूटिंग अपडेट:बुर्ज खलिफामध्ये होणार शाहरुख खानच्या 'पठाण'चे चित्रीकरण, पहिल्यांदाच बॉलिवूड फिल्मचे होणार येथे शूटिंग

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • आतापर्यंत हॉलिवूडमध्येही केवळ दोनच चित्रपटांचे चित्रीकरण बुर्ज खलिफाच्या आत झाले आहे.

बॉलिवूडचा किंग खान शाहरुख लवकरच 'पठाण' या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. शाहरुख सध्या दुबईत या चित्रपटाचे चित्रीकरण करत आहे. आता या चित्रपटाविषयीची एक मोठी आता समोर आली आहे. या चित्रपटाच्या काही दृश्यांचे चित्रीकरण जगातील सर्वात मोठी इमारत म्हणून ओळखल्या जाणा-या बुर्ज खलिफामध्ये होणार आहे. आजवर अनेक चित्रपटांमध्ये बुर्ज खलिफाच्या बाहेरील दृश्य पडद्यावर दिसले आहे. मात्र पहिल्यांदाच याच्या आत एखाद्या चित्रपटाचे चित्रीकरण होणार आहे.

यापूर्वी अक्षय कुमारच्या 'लक्ष्मी' आणि किचा सुदीपच्या 'विक्रांत राणा' मध्ये ही इमारत बाहेरून दाखवण्यात आली होती. आता ताज्या रिपोर्ट्सनुसार, दिग्दर्शक सिद्धार्थ आनंद बिल्डिंगच्या आत शाहरुख खानसोबत काही महत्त्वपूर्ण अॅक्शन सीक्वेन्स चित्रीत करणार आहेत. अशाप्रकारे 'पठाण' या चित्रपटात बुर्ज खलिफाच्या आतील दृश्य पडद्यावर बघता येणार आहेत.

विशेष म्हणजे आतापर्यंत हॉलिवूडमध्येही केवळ दोनच चित्रपटांचे चित्रीकरण बुर्ज खलिफाच्या आत झाले आहे. या दोन चित्रपटांमध्ये टॉम क्रूजच्या 'मिशन इम्पॉसिबल : घोस्ट प्रोटोकॉल' आणि विन डीजल, ड्वेन जॉनसन आणि पॉल वॉकर स्टारर 'फास्ट अँड फ्युरियस 7' यांचा समावेश आहे.

बातम्या आणखी आहेत...