आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान बॉलिवूड एन्ट्रीसाठी सज्ज झाला आहे. पण तो पडद्यावर नव्हे तर पडद्यामागे काम करणार आहे. आर्यनने त्याच्या पहिल्यावहिल्या चित्रपटाची स्क्रिप्ट लिहिली आहे. त्याचे लिखाणाचे काम पूर्ण झाले आहे. शाहरुखच्या रेड चिलीज या प्रोडक्शन हाऊसमधूनच आर्यन पदार्पण करत आहे. आर्यन या प्रोजेक्टद्वारे दिग्दर्शक म्हणून त्याच्या करिअरला सुरुवात करणार आहे.
आर्यन खानने शेअर केली आहे पोस्ट
किंग खानचा मोठा मुलगा आर्यनने 6 डिसेंबर रोजी म्हणजेच मंगळवारी संध्याकाळी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करून त्याच्या डेब्यू प्रोजेक्टची घोषणा केली. पोस्ट शेअर करताना आर्यनने लिहिले- 'लिखाण पूर्ण झाले आहे, आता केवळ अॅक्शन म्हणण्याची प्रतिक्षा आहे.' आर्यनने शेअर केलेल्या फोटोमध्ये टेबलवर एक स्क्रिप्ट ठेवण्यात आले असून त्यावर इंग्रजीत आर्यन खानसाठी असे लिहिले आहे. शिवाय फोटोमध्ये एक क्लॅपर बोर्ड दिसतोय. ज्यावर शाहरुखची प्रोडक्शन कंपनी रेज चिलीज एंटरटेन्मेंट नाव आणि लोगो दिसतोय. म्हणतेच शाहरुखच्या होम प्रोडक्शन अंतर्गत आर्यनचा हा नवा प्रोजेक्ट येत आहे.
आईवडिलांनीही दिली प्रतिक्रिया
आर्यन खानच्या या पोस्टवर त्याच्या आई-वडिलांनी प्रतिक्रिया देत मुलाविषयी कौतुक व्यक्त केले आहे. गौरीने म्हटले, 'बघण्यासाठी अजून वाट पाहू शकत नाही'. तर शाहरुखने लिहिले आहे की, 'विचार करणे, विश्वास ठेवणे, स्वप्न पाहणे पूर्ण झाले आहे. आता धाडस करण्याची वेळ. तुझ्या पहिल्या (सिनेमासाठी) शुभेच्छा. हे नेहमीच खास राहील,' असे म्हटले आहे.
आर्यनच्या पहिल्या प्रोजेक्टसाठी चाहते उत्सुक
आर्यन खानच्या करिअरमधला हा पहिलाच प्रोजेक्ट आहे. शाहरुखचे चाहतेदेखील त्याच्या मुलाच्या नवीन प्रोजेक्टसाठी खूप उत्सुक आहेत. सोशल मीडियावर एका युजरने लिहिले - 'तुझे काम पाहण्यासाठी उत्सुक आहे.' तर आणखी एका यूजरने लिहिले - 'तुझ्या करिअरसाठी तुला खूप शुभेच्छा.' अशा प्रतिक्रियांनी कमेंट बॉक्स भरलेला आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.