आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आजही शाहरुख-गौरीची 'मन्नत' पूर्ण झाली नाही:आर्यनला अजून सहा दिवस तुरुंगातच घालवावे लागणार; NDPS कोर्ट 20 ऑक्टोबरपर्यंत सुनावणी स्थगित केली, अरबाज आणि मुनमुनदेखील तुरुंगातच राहणार

5 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • एनसीबीने आर्यनच्या जामिनाला आपला विरोध दर्शवत आपली बाजू मांडली.
  • आर्यनचे वकील आणि एनसीबीचे वकील यांच्यात युक्तीवाद सुरु असून आर्यनला जामीन मिळणार की नाही याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे

क्रूझ ड्रग्ज पार्टी प्रकरणात अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यनच्या अडचणी कमी होताना दिसत नाहीयेत. त्याला अजून सहा दिवस तुरुंगातच घालवावे लागणार आहेत. न्यायालयाने 20 ऑक्टोबरपर्यंत आर्यनच्या जामीन अर्जावरील निर्णय राखीव ठेवला आहे. आर्यनसोबतच अरबाज मर्चंट आणि मुनमुन धमीचा हे देखील 20 ऑक्टोबरपर्यंत तुरुंगातच राहणार.

जामीन याचिकेवर आज मुंबईतील सत्र न्यायालयात सुनावणी झाली असून सुनावणीदरम्यान सरकारी वकील (अतिरिक्त सॉलिसिटर जनरल ) अनिल सिंग यांनी शौविक चक्रवर्ती प्रकरणातील उच्च न्यायालयाच्या निर्णयाचा एक भाग वाचून दाखवला. त्यानुसार, या प्रकरणात तर्क असा होता की ड्रग्जची जप्ती नव्हती, परंतु या प्रकरणात जप्ती झाली आहे.

उच्च न्यायालयाने आपल्या निकालात असे म्हटले आहे की, आरोपी हा तपासातील एक महत्त्वाचा दुवा आहे आणि तिथे मनी लाँडरिंग होते. एनडीपीएस अंतर्गत सर्व जामीनपात्र गुन्हे अजामीनपात्र आहेत असे न्यायालयाने म्हटले होते. ड्रग्जची रिकव्हरी झाली नसली तरी तुम्ही ड्रग्ज विक्रेत्यांच्या संपर्कात होता, त्यामुळे जामीन मंजूर होऊ शकत नाही, असे न्यायालयाने म्हटले होते. सध्याच्या प्रकरणातील ड्रग्ज विक्रेते अचित आणि शिवराज आहेत, ज्यांच्याशी आरोपी संपर्कात होते.

आज सुनावणी उशीराने सुरु झाली

क्रूझ ड्रग्ज पार्टी प्रकरणात अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यनचा तुरुंगातील आज 7 वा दिवस आहे. त्याच्या जामीन अर्जावर आज मुंबईच्या सत्र न्यायालयात सुनावणीला सुरुवात झाली आहे. शाहरुखची मॅनेजर पूजा ददलानी आणि बॉडीगार्ड न्यायालयात हजर आहेत. खरं तर आज 12 वाजता सुनावणीला सुरुवात होणार होती. मात्र एनसीबीतर्फे न्यायालयात बाजू मांडणारे अतिरिक्त सॉलिसिटर जनरल (एएसजी) अनिल सिंग हायकोर्टात दोन प्रकरणाच्या सुनावणीत व्यस्त असल्याने ते उशीराने सत्र न्यायालयात पोहोचलेले. उशीरा आल्याने अनिल सिंग यांनी न्यायालयाची माफी मागितली.

लाइव्ह अपडेट्स

  • सरकारी वकील अनिल सिंग यांनी न्यायालयाला सांगितले की, आर्यनचा मित्र अरबाजकडून 6 ग्रॅम ड्रग्ज जप्त करण्यात आले आहेत आणि आर्यनला याबद्दल काहीच माहिती नव्हती असे तो म्हणू शकत नाही. दोघेही चांगले मित्र आहेत आणि दोघेही ते एन्जॉय करणार होते.
  • अनिल सिंग म्हणाले की, मी न्यायालयासमोर एनसीबीच्या उत्तराचा पॅरा 12 ठेवू इच्छितो. तथ्यांवर आधारित, माझे निवेदन आहे की, आर्यन खानने पहिल्यांदाच ड्रग्जचे सेवन केलेले नाही. रेकॉर्ड आणि पुरावे दर्शवतात की, तो गेल्या काही वर्षांपासून नियमितपणे बंदी घातलेल्या पदार्थांचे सेवन करत आहे.
  • अनिल सिंगनी सांगितले की, हार्ड ड्रगचा वापर एवढ्या जास्त प्रमाणात वैयक्तिक कारणासाठी केला जाऊ शकत नाही. चॅटमधून ड्रग्जच्या प्रमाणाचा अंदाज बांधला जाऊ शकतो. पेडलर, कादिर आणि परदेशी नागरिक अचित कुमारच्या संपर्कात होते. परदेशी नागरिकाचा शोध घेण्यासाठी आम्ही मंत्रालयाच्या संपर्कात आहोत.
  • अनिल सिंगनी 13 वेगवेगळ्या प्रकरणांचा संदर्भ देत आर्यनच्या जामिनाला कडाडून विरोध केला आहे. यातील काही प्रकरणांमध्ये आरोपींकडे ड्रग्ज मिळणे, काहींकडे ते न मिळणे आणि काही कटात सामील असलेल्या आरोपींचा जामीन चौकशी होईपर्यंत न दिल्याचा उल्लेख केला आहे. एएसजींनी सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालयाच्या निर्णयांचा संदर्भ घेतला आहे.
  • अनिल सिंग म्हणाले की, आमचे अधिकारी अमली पदार्थाच्या विरोधात अहोरात्र काम करत आहेत. काही अधिकाऱ्यांवर काही दिवसांपूर्वी हल्लाही झाला होता. अमली पदार्थांचा तरुणांवर परिणाम होत आहे. तरुण हे आपल्या देशाचे भविष्य आहेत, हे मला न्यायालयाला सांगण्याची गरज नाही. देशाचे भवितव्य या पिढीवर अवलंबून आहे. ही महात्मा गांधी आणि बुद्धांची भूमी आहे. तपास प्राथमिक टप्प्यात आहे, हा जामीन देण्याचा टप्पा नाही.

एनसीबी करत आहेत आर्यनच्या जामिनाला विरोध

तत्पूर्वी बुधवारी सुनावणी सुमारे 3 तास चालली, परंतु युक्तिवाद पूर्ण होऊ शकला नाही. या दरम्यान बचाव पक्षाने आर्यनला जामीन मिळावा म्हणून नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (एनसीबी)च्या पंचनाम्यासह आरोपींवर लावण्यात आलेल्या कलमांवर युक्तिवाद केला, तर एनसीबीने जामिनाला आपला विरोध दर्शवत आपली बाजू मांडली.

आर्यनच्या वतीने वरिष्ठ वकील अमित देसाई आणि एनसीबीतर्फे अतिरिक्त सॉलिसिटर जनरल (एएसजी) अनिल सिंग न्यायालयात हजर होते. एएसजीने म्हटले आहे, या प्रकरणात एका आरोपीची भूमिका दुस -यापासून वेगळी करता येत नाही. एनसीबीकडे पुरेसे साहित्य आहे जे दर्शवते की आर्यन खान परदेशातील काही लोकांच्या संपर्कात होता. आर्यनशी संबंधित काही आंतरराष्ट्रीय दुवे शोधले गेले आहेत जे प्रथम अवैध ड्रग्ज खरेदीचे संकेत देतात.

एएसजीने म्हटले की, आर्यनला प्रभावशाली व्यक्ती आहे. जामीनावर बाहेर आल्यानंतर तो पुराव्यांशी छेडछाड करु शकतो. आर्यन आणि अरबाज मर्चंट यांना आंतरराष्ट्रीय क्रूझ ग्रीन मुंबई येथे पकडले गेले, जिथे ते एमव्ही एम्प्रेस कार्डशिवाय प्रवेश करू शकत नाहीत. या सर्व बाबी तपासण्यासाठी तपास आवश्यक आहे.

सामान्य बॅरेकमध्ये शिफ्ट झाला आर्यन

गुरुवारी, आर्यन खानसह इतर पाच आरोपींना क्वारंटाईन सेलमधून कॉमन सेलमध्ये हलवण्यात आले आहे. आर्थर रोड कारागृहाचे अधीक्षक नितीन वायचल म्हणाले की, आर्यनला घरचे जेवण दिले जात नाही. त्याला आता नियमानुसार सामान्य बॅरेकमध्ये हलवण्यात आले आहे.

एनसीबी म्हणाले - ड्रग्ज प्रकरणात आर्यनची महत्वाची भूमिका आहे
एनसीबीने म्हटले की, आर्यन आणि अन्य एका आरोपीने अरबाजकडून ड्रग्ज खरेदी केले होते. एनसीबीने न्यायालयात व्हॉट्सअॅप चॅट देखील सादरे केले आणि दावा केला की, या चॅटच्या तपासात उघड झाले आहे की ड्रग्ज प्रकरणात आर्यन खानची महत्वाची भूमिका होती. त्यांच्या प्रकरणाला वेगळे मानले जाऊ शकत नाही, कारण हे सर्व रेव्ह पार्टीचा भाग होते. आर्यनच्या वकिलाने युक्तिवाद केला की, त्यांच्या क्लायंटकडे कोणतेही ड्रग्ज सापडले नाहीत.

आर्यन ड्रग पॅडलरच्या संपर्कात असल्याचा देखील दावा
एनसीबीने न्यायालयाला सांगितले की, ड्रग तस्कर अचिंत कुमार आणि शिवराज आर्यन अरबाजला चरस पुरवत होते. यावर आर्यनचे वकील देसाई यांनी युक्तिवाद केला की, एनसीबी वारंवार ड्रग्ज आणि रोख रकमेबद्दल बोलत आहेत, परंतु आर्यनकडून त्यांना काहीही सापडले नाही. आर्यनकडून ना चरस, ना एमडी किंवा कोणतीही गोळी किंवा रोख जप्त करण्यात आली आणि एनसीबीने अरबाजकडून फक्त 6 ग्रॅम चरस जप्त केले.

देसाई यांचा आरोप - आर्यनला जबाब देण्यास भाग पाडले गेले

आर्यनचे वकील अमित देसाई यांनी आर्यनच्या कबुलीजबाबाचे सक्तीचे विधान म्हणून वर्णन केले आहे. देसाई म्हणाले की, एनसीबीच्या म्हणण्यानुसार, आर्यनने कबूल केले की तो अरबाजसोबत चरस घेणार होता, परंतु अशा गोष्टी कशा स्वीकार करायला लावले जाते, हे देखील न्यायालयाला माहित आहे.

बातम्या आणखी आहेत...