आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

NCBच्या चौकशीत खुलासा:मागील चार वर्षांपासून ड्रग्ज घेतोय शाहरुख खानचा मुलगा आर्यन, एनसीबीच्या चौकशीत कोसळले रडू; फोनवर झाले वडिलांशी बोलणे

16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • भारतच नव्हे देशाबाहेरदेखील केले ड्रग्जचे सेवन

अमली पदार्थ विरोधी पथकाने (एनसीबी) शनिवारी मुंबईत मोठी कारवाई करत मुंबईच्या समुद्रात क्रूझवर सुरु असलेल्या एका रेव्ह पार्टीवर धाड टाकली. या कारवाईत एनसीबीने अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानसह आठ जणांना ताब्यात घेतले. यावेळी या रेव्ह पार्टीतून मोठ्या प्रमाणात ड्रग्ज जप्त करण्यात आले असून त्याची किंमत कोट्यवधीमध्ये असल्याचे सांगितले जात आहे.

याप्रकरणी शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानची तब्बल 22 तासांहून अधिक काळ चौकशी झाल्याचे समजते. या चौकशीत आर्यन ढसाढसा रडल्याचे सांगितले जाते. तसेच या चौकशीवेळी आर्यनने एक मोठा खुलासा तपास अधिकाऱ्यांकडे केल्याचे सूत्रांकडून समजते.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एनसीबीने सापळा रचून या क्रूझवर प्रवेश केला आणि या रेव्ह पार्टीतून कोकेन, चरस, हशीश, एमडी, एमडीएमए जप्त केले. क्रूझवरुन ताब्यात घेतलेल्या सगळ्यांची चौकशी अधिकाऱ्यांनी केली. या चौकशीवेळी आर्यन ढसाढसा रडत असल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्याचप्रमाणे गेल्या चार वर्षांपासून ड्रग्जचे सेवन करत असल्याचेही त्याने एनसीबीच्या अधिकाऱ्यांना सांगितले.

भारतच नव्हे देशाबाहेरदेखील केले ड्रग्जचे सेवन

एनसीबी अधिकाऱ्यांनी केलेल्या चौकशीदरम्यान आर्यनने सांगितले की, केवळ भारतातच नाही तर परदेशातही त्याने ड्रग्जचे सेवन केले आहे. यामध्ये युके, दुबई या देशांचा त्याने उल्लेख केला आहे. तसेच आर्यनबरोबर अटक करण्यात आलेल्या अरबाजला तो 15 वर्षांपासून ओळखत असल्याचेही सांगितले. एनसीबीच्या अधिकाऱ्यांचा पुन्हा क्रुझवर छापा

वडिलांशी फोनवर बोलला आर्यन
एनबीसीच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शाहरुख खानने मुलगा आर्यन खानशी फोनवर संवाद साधला. जवळपास दोन मिनिटे आर्यनने त्याच्या वडिलांशी संवाद साधला. दरम्यान आर्यनला रडू कोसळल्याचे म्हटले जात आहे.

बातम्या आणखी आहेत...