आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कुणी काम देतं का काम...:पत्नी मीरामुळे शाहिद कपूरवर आली सोशल मीडियावर काम मागण्याची वेळ, वाचा हे नेमकं प्रकरण आहे तरी काय!

3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • मीरा शाहिद करत असलेल्या चित्रपटांवर खुश नाहिये.

‘कबीर सिंग’ हा चित्रपट हिट झाल्यानंतर अभिनेता शाहिद कपूरला अनेक मोठ्या चित्रपटांच्या ऑफर येत आहेत. अलीकडेच त्याने जर्सी या आगामी चित्रपटाचे चित्रीकरणही पूर्ण केले आहे. शिवाय त्याने आपल्या मानधनातही वाढ केल्याची चर्चा ऐकिवात आहे. मात्र असे असतानाही शाहिदवर चक्क सोशल मीडियावर काम मागण्याची वेळ आली आहे.

होय, तुम्ही बरोबर वाचलंय... शाहिदने सोशल मीडियावर एक पोस्ट लिहिल चक्क कामाची मागणी केली आहे. विशेष म्हणजे यासाठी त्याने त्याची पत्नी मीरा राजपूत हिला जबाबदार ठरवले आहे.

होय, मीरा शाहिद करत असलेल्या चित्रपटांवर खुश नसून त्याने वेगळ्या धाटणीचे चित्रपट करावे, अशी तिची अपेक्षा आहे. याचा खुलासा खुद्द शाहिदनेच सोशल मीडियावर केला आहे. शाहिदने डान्स चित्रपटात काम करावे, असे मीराचे मत आहे. यासंदर्भात शाहिदने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत लिहिले, “माझ्या पत्नीने मला एक प्रश्न विचारला आहे. ज्या चित्रपटात मला धमाल मस्ती आणि डान्स करायला मिळेल असा चित्रपट मी का करत नाही, असे मीराने मला विचारले आहे. तर अशा प्रकारचा चित्रपट असेल तर कृपया मला संधी द्या, जेणेकरून मी माझ्या पत्नीला खूश करू शकेन”, असे त्याने या पोस्टमध्ये लिहिले आहे.

शाहिदच्या आगामी 'जर्सी'ची रिलीज डेट अद्याप जाहीर केलेली नाही
शाहिद तेलुगू चित्रपटाचा हिंदी रिमेक असलेल्या 'जर्सी' या चित्रपटाच मुख्य भूमिका साकारताना दिसणार आहे. या चित्रपटात शाहिद कपूर निवृत्त क्रिकेटपटूच्या भूमिकेत दिसणार आहे. जो आपल्या कमबॅकसाठी प्रयत्न करतो. या चित्रपटात शाहिद व्यतिरिक्त मृणाल ठाकूर आणि ज्येष्ठ अभिनेते पंकज कपूर मुख्य भूमिका साकारणार आहेत. अमन गिल, दिल राजू आणि अल्लू अरविंद यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही.

बातम्या आणखी आहेत...