आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

28 वर्षांची झाली मीरा कपूर:शाहिद कपूरने साजरा केला पत्नीचा वाढदिवस, जिनिलिया-रितेशही पोहोचले

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड अभिनेता शाहिद कपूरची पत्नी मीरा कपूरने 7 सप्टेंबर 2022 रोजी तिचा 28 वा वाढदिवस साजरा केला. या निमित्ताने शाहिदने मीरासाठी एका ग्रँड बर्थडे पार्टीचे आयोजन केले होते. या पार्टीत जिनिलिया आणि रितेश देशमुख यांच्यासह अनेक सेलिब्रिटी दिसले. या सेलिब्रेशनचे काही व्हिडिओ समोर आले आहेत. या व्हिडिओमध्ये मीरा काळ्या रंगाचा ड्रेसमध्ये तर शाहिद ग्रे शर्ट आणि पांढऱ्या रंगाच्या पँटमध्ये दिसला. दोघांनीही पापाराझींना पोज दिली. यावेळी रितेश पांढरा शर्ट आणि गुलाबी पॅन्टमध्ये दिसला. तर जिनिलिया कलरफुल आउटफिटमध्ये स्पॉट झाली. यांच्यासह कुणाल खेमू, फरहान अख्तर आणि त्याची पत्नी, शाहिदचा भाऊ इशान खट्टर, आई निलीमा अझीम, वडील पंकज कपूर, बहीण सना यांच्यासह अनेक सेलेब्स या पार्टीत पोहोचले होते. बघा व्हिडिओ...

बातम्या आणखी आहेत...