आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

शूट रॅप-अप:शाहिद कपूरने पूर्ण केली 'जर्सी'ची शूटिंग, टीमबरोबर केक कापून साजरा केला आनंद

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख अद्याप जाहीर केलेली नाही

अभिनेता शाहिद कपूरने आपल्या आगामी ‘जर्सी’ चित्रपटाची शूटिंग पूर्ण केली आहे. सोशल मीडियावर याविषयीची माहिती देताना शाहिदने फोटोसह भावनिक नोट शेअर केली आहे. शेअर केलेल्या फोटोत शाहिद चित्रपटाचे शूटिंग पूर्ण झाल्याच्या निमित्ताने टीमबरोबर केक कापून सेलिब्रेशन करताना दिसत आहे. '14 डिसेंबर 2019 ते 14 डिसेंबर 2020 पर्यंत... ही माझी ड्रीम टीम आहे आहे. मी टीममधील प्रत्येक सदस्याचे आभार मानतो', अशा आशयाचे कॅप्शन शाहिदने दिले आहे.

शाहिदने आणखी एक फोटोही शेअर केला आणि लिहिले, 'जर्सी'चे चित्रीकरण पूर्ण झाले आहे. कोविडच्या काळात 47 दिवसांचे शूट पूर्ण झाले. हे अविश्वसनीय आहे. मला संपूर्ण टीमचा अभिमान आहे. हे चमत्कारापेक्षा कमी नाही. स्वतःचा जीव धोक्यात टाकून दररोज सेटवर येणे आणि आपण ज्यावर प्रेम करतो, ते काम करत राहणे... यासाठी मी युनिटमधील प्रत्येक सदस्याचे आभार मानू इच्छितो', असे शाहिद म्हणाला आहे.

चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख अद्याप जाहीर केलेली नाही
'जर्सी' हा चित्रपट याच नावाच्या तेलगू चित्रपटाचा अधिकृत हिंदी रिमेक आहे. या चित्रपटात शाहिद कपूर निवृत्त क्रिकेटपटूच्या भूमिकेत दिसणार आहे. जो आपल्या कमबॅकसाठी प्रयत्न करतो. या चित्रपटात शाहिद व्यतिरिक्त मृणाल ठाकूर आणि ज्येष्ठ अभिनेते पंकज कपूर मुख्य भूमिका साकारणार आहेत. अमन गिल, दिल राजू आणि अल्लू अरविंद यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser