आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुलांचे फोटो क्लिक केल्याने पापाराझींवर भडकला शाहिद:ट्रोलर्स म्हणाले - चित्रपट मिळणे बंद झाले पण अ‍ॅट्यूड कमी झाला नाही

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूडचा लोकप्रिय अभिनेता शाहिद कपूर 4 जानेवारी रोजी पत्नी मीरा राजपूतसोबत मुंबईत परतला. नवीन वर्षे साजरे करण्यासाठी शाहिद कुटुंबासोबत बाहेर फिरायला गेला होता. दरम्यान तो पत्नी आणि मुलांसोबत विमानतळावर स्पॉट झाला. खरं तर शाहिद फोटोग्राफर्सना आनंदाने भेटत असतो. पण यावेळी विमानतळावरील त्याचे वागणे पाहून नेटकरीही अवाक् झाले. शाहिद आणि मीरा विमानतळाबाहेर दाखल झाल्यानंतर पापाराझी त्यांच्या फोटोसाठी त्यांच्याभोवती गराडा करू लागले. मात्र यावेळी पापराझींचे वागणे पाहून शाहिदचा पारा चढला.

लोकांना आवडले नाही शाहिदचे वागणे
विमानतळावरुन बाहेर येताच पापराझींनी शाहिद आणि मीराभोवती गराडा घातला. दोघांनी त्यांना पोझही दिल्या. थोडा वेळ ते दोघेही तिथे थांबले. त्यानंतर ते दोघे आपल्या गाडीत येऊन बसले. मात्र पापराझी त्यांच्या गाडीजवळ येऊन त्यांना व्हिडिओ काढू लागले. हे पाहून शाहिदचा पारा चढला. शाहिद रागातच त्यांना तुम्ही व्हिडिओ कशासाठी घेताय, असा प्रश्न विचारताना दिसतोय. शाहिद म्हणतो, 'का घेताय तुम्ही व्हिडिओ? कशासाठी?'

शाहिदचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. या व्हिडिओवर काही नेटकरी त्याला ट्रोल करताना दिसतायत. एका नेटकऱ्याने म्हटले, "चित्रपट मिळणे बंद झाले, पण अॅटीट्यूड कमी झाला नाही."

आणखी एका नेटक-याने लिहिले, "तुम्ही यांना इतका भाव का देता. त्यामुळेच हे लोक एवढे नखरे दाखवतात."

शाहिदचा 'जर्सी' चित्रपट ठरला होता फ्लॉप
शाहिद कपूरचा नुकताच रिलीज झालेला 'जर्सी' हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरला. आता 2023 मध्ये शाहिदचे अनेक चित्रपट प्रदर्शनासाठी सज्ज आहेत. यामध्ये ब्लडी डॅडी आणि बुल यांसारख्या चित्रपटांचा समावेश आहे.

शाहिदच्या पर्सनल लाईफबद्दल बोलायचे झाले तर त्याने 2015 मध्ये मीरा राजपूतसोबत लग्न केले होते. मीरा आणि शाहिद यांच्या वयात 10 वर्षांचे अंतर आहे. लग्नापूर्वी मीरा एका सामान्य कुटुंबातील होती. शाहिद आणि मीरा यांना मीशा आणि झैन ही दोन मुले देखील आहेत.

शाहिद आपल्या कुटुंबासोबत नवीन वर्ष साजरे करण्यासाठी परदेशात गेला होता. मीराने तिथले बीचवरील फोटोही शेअर केले होते.

बातम्या आणखी आहेत...