आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जर्सी:शाहिदने सांगितली 'कबीर सिंग'नंतरच्या दिवसांची अवस्था, म्हणाला- चित्रपट रिलीज झाल्यानंतर मी भिकाऱ्यासारखा निर्मात्यांकडे गेलो होतो

11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • शाहिद म्हणतो - हा चित्रपट त्याचा आत्तापर्यंतचा सर्वोत्तम चित्रपट

बॉलिवूड अभिनेता शाहिद कपूरचा आगामी चित्रपट 'जर्सी'चा ट्रेलर रिलीज झाला आहे. या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाल्यानंतर शाहिदने मुलाखतीदरम्यान खुलासा केला की, 'कबीर सिंग'च्या जबरदस्त यशानंतर तो 'जर्सी' या चित्रपटासाठी अनेक चित्रपट निर्मात्यांकडे गेला होता आणि त्यांना 'जर्सी' चित्रपट बनवण्याची विनंती केली होती. पण त्याला कुणी गांभीर्याने घेतले नाही.

'कबीर सिंग'मुळे पहिल्यांदाच 200-250 कोटी क्लबचा भाग बनला शाहिद कपूर
शाहिद सांगतो, "'कबीर सिंग' रिलीज झाल्यानंतर मी भिकाऱ्यासारखा सगळ्यांकडे गेलो. 200-250 कोटींचे चित्रपट बनवणाऱ्या सर्व लोकांकडे मी गेलो. मी या क्लबचा कधीच भाग नव्हतो. त्यामुळे माझ्यासाठी ते पूर्णपणे नवीन होते. 15-16 वर्षे इंडस्ट्रीत घालवल्यानंतर, माझ्या चित्रपटांची एवढी मोठी कमाई कधीच झाली नव्हती. त्यामुळे, शेवटी जेव्हा हे घडले, तेव्हा मला माहित नव्हते की मला कुठे जायचे आहे. हे माझ्यासाठी पूर्णपणे नवीन होते."

शाहिद म्हणतो - हा चित्रपट त्याचा आत्तापर्यंतचा सर्वोत्तम चित्रपट
शाहिद म्हणतो, "कबीर सिंगपूर्वी मला 'जर्सी' हा चित्रपट ऑफर करण्यात आला होता, तेव्हा मी त्याला नाही म्हणण्याचा पूर्ण प्रयत्न केला. त्यामुळे माझ्यासोबत काम करण्यासाठी आणि माझी वाट पाहण्यासाठी मी या चित्रपटाचे दिग्दर्शक गौतम यांचे आभार मानतो. मी निश्चितपणे सांगू शकतो की हा चित्रपट माझा आत्तापर्यंतचा सर्वोत्तम चित्रपट आहे."

चित्रपटाची स्क्रिप्ट वाचून भावूक झाला होता शाहिद कपूर
शाहिद म्हणाला, "मी या चित्रपटाची कथा ऐकली आणि ती ऐकून मला खूप आनंद झाला. 'कबीर सिंग' रिलीज होण्याच्या 2 आठवड्या आधी मला जर्सी चित्रपटाची ऑफर आली होती. त्यावेळी मी स्क्रिप्ट वाचली. तेव्हा मीरा आणि माझा मॅनेजर माझ्यासोबत बसले होते. जर्सी चित्रपटाचे कथानक माझ्या ह्रदयाला भिडले. त्यामुळे मी या चित्रपटाची स्क्रिप्ट वाचताना भावूक झालो होतो. ते दोघेही मला पाहून थक्क झाले होते."

चित्रपटात मृणाल ठाकूर आणि पंकज कपूर यांच्याही महत्त्वाच्या भूमिका
गौतम तिन्नुरी दिग्दर्शित या चित्रपटात शाहिदसोबत मृणाल ठाकूर आणि पंकज कपूर यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. या चित्रपटात मृणाल शाहिदच्या पत्नीची भूमिका साकारत आहे. तसेच शाहिदचे वडील पंकज कपूरही या चित्रपटात प्रशिक्षकाच्या भूमिकेत आहेत. एक खेळाडू कसे क्रिकेट सोडून देतो आणि नंतर आपल्या मुलासाठी जर्सी विकत घेण्यासाठी मैदानात कसा परततो हे या चित्रपटात दाखवण्यात आले आहे. हा चित्रपट 31 डिसेंबरला सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे.

नुकताच प्रदर्शित झाला ट्रेलर
‘जर्सी’च्या 2 मिनिटे 53 सेकंदाच्या ट्रेलरच्या सुरुवातीला शाहिद एक क्रिकेटपटू असल्याचे दाखवण्यात आले आहे. पण काही कारणास्तव तो क्रिकेट खेळणे सोडून देतो. त्यानंतर मुलाला नवी जर्सी घेऊन देण्यासाठी तो प्रयत्न करत असल्याचे दाखवण्यात आले आहे. त्याचे पत्नी मृणाल ठाकूरसोबत भांडणही होते. दरम्यान, क्रिकेट टीममध्ये असिस्टंट कोचच्या नोकरीची ऑफर त्याला देण्यात येते. पण ती स्वीकारण्यास शाहिद नकार देतो. जर्सी या तेलुगू चित्रपटाचा हा चित्रपट रिमेक आहे.

बातम्या आणखी आहेत...