आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

शाहिदचा ऐतिहासिक चित्रपट:लवकरच छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत झळकू शकतो शाहिद कपूर, या निर्मात्यांशी सुरु आहे बोलणी

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • हा चित्रपट बॉलिवूडमधील बिग बजेट चित्रपट असणार आहे.

शाहिद कपूर सध्या बॉलिवूडमधील बिझी अभिनेत्यांपैकी एक आहे. अलीकडेच त्याचा 'कबीर सिंह' हा चित्रपट खूप गाजला. हा चित्रपट त्याच्या करिअरमधील सर्वात मोठा ब्लॉकबस्टर चित्रपट ठरला. कबीर सिंहनंतर त्याने 'जर्सी' चित्रपट पूर्ण केला. काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाचे चित्रीकरण त्याने पूर्ण केले. शाहिदचा हा चित्रपट यावर्षी दिवाळीत रिलीज होणार आहे. या चित्रपटाचे चित्रीकरण संपत नाही तोच शाहिदने राज अँड डीकेच्या आगामी वेब सीरिजच्या चित्रीकरणाला सुरुवात केली. या माध्यमातून शाहिद आता ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाऊल टाकणार आहे. आता ताज्या रिपोर्ट्सनुसार, शाहिद कपूर ऐतिहासिक व्यक्तिरेखा साकारणार आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत दिसणार शाहिद

दीपिका पादुकोण स्टारर फिल्म 'पद्मावत' या चित्रपटात शाहिदने महाराजा महारावल रतन सिंगची भूमिका साकारली होती. आता शाहिद कपूर आणखी एका ऐतिहासिक भूमिकेत दिसू शकतो. रिपोर्टनुसार, 'कबीर सिंह' या चित्रपटाचे निर्माता अश्विन वर्दे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित चित्रपटासाठी लाइका प्रॉडक्शनसोबत हातमिळवणी केली आहे. मुख्य भूमिकेसाठी त्यांनी शाहिद कपूरकडे संपर्क साधला आहे. शाहिदला चित्रपटाची कल्पना आवडली आहे. पण अद्याप त्याने निर्मात्यांना आपला होकार कळवला नाही. हा चित्रपट बॉलिवूडमधील बिग बजेट चित्रपट असणार आहे.

विशेष म्हणजे यापूर्वी अनेक निर्मात्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित चित्रपटाची योजना आखली आहे. अभिनेता रितेश देशमुखने काही दिवसांपूर्वीच छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर चित्रपट बनवणार असल्याची घोषणा केली होती. या चित्रपटात रितेश स्वतः मुख्य भूमिका साकारणार आहे. याशिवाय अली अब्बाज जफर हेदेखील सलमान खानला मुख्य भूमिकेत घेऊन छत्रपतींच्या जीवनावर चित्रपट बनवणार असल्याने चर्चेत आहेत. मात्र आतापर्यंत यापैकी कोणताही चित्रपट फ्लोअरवर आलेला नाही. त्यामुळे आता सगळ्यांचे लक्ष अश्विन वर्देंकडे लागले आहे. ते कधी या चित्रपटावर प्रत्यक्षात काम सुरु करणार हे बघावे लागेल.

बातम्या आणखी आहेत...