आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करागतकाळातील प्रसिद्ध अभिनेते राजकुमार यांची मुलगी वास्तविकता पंडित अभिनेता शाहिद कपूरची मोठी फॅन होती. शाहिदच्या प्रेमात ती इतकी आकंठ बुडाली होती की, शाहिद जिथे जायचा तिथे ती त्याचा पाठलाग करायची. या दोघांची पहिली भेट सेलिब्रिटी कोरिओग्राफर श्यामक दाबर यांच्या डान्स क्लासमध्ये झाली होती. तिथेच ती शाहिदच्या लूक्सवर फिदा झाली होती.
वास्तविकता शाहिदची पत्नी म्हणून स्वतःची ओळख करुन देत होती. शाहिद तिला एवढा वैतागला होता की, त्याला पोलिसांत तिच्याविरुद्ध तक्रार द्यावी लागली होती.
शाहिदचा पाठलाग करायची वास्तविकता
दिग्गज अभिनेते राजकुमार यांची मुलगी वास्तविकता पंडितमुळे शाहिद त्रस्त झाला होता. शाहिद आणि वास्तविकता यांची भेट शामक दावर यांच्या डान्स क्लासमध्ये झाली होती. त्यांनी एकत्रच याठिकाणी प्रवेश घेतला होता. त्यावेळी शाहिदने अभिनय क्षेत्रात काम करण्यास सुरुवात केली नव्हती. त्याकाळात वास्तविकता त्याच्या प्रेमात पडली होती, ती शाहिदच्या प्रेमात अक्षरश: वेडी झाली होती आणि तिने सतत शाहिदचा पाठलाग करण्यास सुरुवात केली होती.
शाहिदची पत्नी म्हणून करून द्यायची स्वत:ची ओळख
हा किस्सा साधारण 2012 मधील आहे. शाहिदने त्यावेळी वास्तविकताविरोधात पोलिसात तक्रार दाखल केली होती. त्याने असे नमूद केले होते की, तो जिथे जातो तिथे ती त्याच्या मागे येते. चित्रपटाच्या सेटवर किंवा कुठे फिरायला गेल्यास ती तिथे येते. अनेकदा ती त्याच्या कारच्या बोनेटवर येऊन बसायची, कारण तिला सांगायचे असायचे की, ती त्याची किती मोठी फॅन आहे. ती शाहिदच्या घराजवळ असणाऱ्या घरात येऊन राहू लागली. तसेच शेजाऱ्यांनी ती त्याची पत्नी असल्याचेही सांगायची. या प्रकारानंतर शाहिदने तिची तक्रार केली होती, त्यानंतर वास्तविकता त्याच्या आयुष्यात परतली नाही.
सुपरस्टारची मुलगी असूनही अभिनयात यशस्वी होऊ शकली नाही
वास्तविकता पंडित हिने 1996 मध्ये चित्रपटांमध्ये पदार्पण केले, परंतु दीर्घ संघर्षानंतरही तिला यश मिळाले नाही आणि ती फक्त एक स्ट्रगलर राहिली. सुपरस्टारची मुलगी असूनही तिला वडिलांप्रमाणे बॉलिवूडमध्ये यश मिळू शकले नाही.
प्रसिद्धी मिळवण्यासाठी तिने शाहिद कपूरच्या नावाचा वापर केला, पण त्याचादेखील फायदा तिच्या करिअरला होऊ शकला नाही. मीडिया रिपोर्ट्सनुसार, शाहिदवरील एकतर्फी प्रेमामुळे तिने अभिनय, डान्स आणि फिटनेस क्लासेस सगळे सोडले होते. ती रात्रंदिवस शाहिदच्या अपार्टमेंटच्या शेजारील घरी राहू लागली.
सुशिक्षित आहे वास्तविकता, कोणता आजारही नव्हता...
असे म्हणतात की, वास्तविकताला कोणताही आजार नव्हता. ती सुशिक्षितही आहे. न्यूयॉर्कमधून पदवी पूर्ण केल्यानंतर तिने मुंबईत अभिनयाचे धडे गिरवले.
दिग्दर्शक लॉरेन्स डिसूझा यांनी 2000 मध्ये तिला त्यांच्या 'दिल भी क्या चीज है' या चित्रपटात कास्त केले होते. पण नंतर तिला या चित्रपटातून काढण्यात आले होते. दिग्दर्शकाला तिचा अभिनय आवडला नाही आणि त्यामुळे तिला चित्रपटातून वगळण्यात आले, अशी चर्चा रंगली होती.
दोन भावांची एकुलती एक बहीण वास्तविकता
राजकुमार यांनी 4 दशकांत जवळपास 70 बॉलिवूड चित्रपटांमध्ये काम केले. त्यांच्या उत्कृष्ट डायलॉग डिलिव्हरीसाठी ते आजही लोकांच्या स्मरणात आहेत. राजकुमार त्यांच्या चित्रपटांमध्ये अनेकदा रॉयल अंदाजात दिसले आणि हा अंदाज त्यांना शोभेल असा होता.
राजकुमार यांचा जन्म एका काश्मिरी पंडित कुटुंबात झाला होता, त्यांचे खरे नाव कुलभूषण पंडित होते. अभिनेता होण्यासाठी त्यांनी सब इन्स्पेक्टरची नोकरी सोडली. त्यांना एकुण तीन मुले आहेत. पुरू राजकुमार, पाणिनी राजकुमार ही त्यांच्या मुलांची नावे तर वास्तविकता हे त्यांच्या मुलीचे नाव आहे. सध्या वास्तविकता कुठे आहे आणि काय करत आहे, याची माहिती उपलब्ध नाही.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.