आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुलाखत:शाहिची पत्नी मीरा पहिल्यांदाच बोलली मातृत्व आणि पालकत्वाबाबत, म्हणाली - ‘मुलांबाबत शाहिद खूप मवाळ आणि मी जरा कडक आहे’

अमित कर्ण. मुंबई3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • शाहिद कपूरची पत्नी मीराने पहिल्यांदाच मातृत्व आणि पालकत्वाबाबत दैनिक भास्करसोबत केली खास चर्चा...

मीरा राजपूत अलीकडे बायो-ऑयल प्रेगाथॉन या कार्यक्रमात सहभागी झाली होती. यात सर्व महिलांनी फिट राहण्याचा संकल्प केला आणि आई झाल्याचा प्रवास साजरा केला होता. याबाबत अमित कर्ण यांनी मीराशी चर्चा केली....

  • मातृत्वाचा टप्पा तू कसा सांभाळलास?

मी प्रत्येक क्षण मजेत घालवला. मग ती पहिली सोनोग्राफी असो किंवा ज्यावेळी क्रेविंग्स सुरू होतात किंवा त्यानंतर पहिली मॅटरनिटी पॅट खरेदी केली होती तो क्षण असो. त्या दिवसांमध्ये मी चांगले -चांगले पदार्थ खाल्ले होते. अर्ध्या रात्री उठून आलू पुरी देखील खाल्ली होती. आइस्क्रीमपण खाल्ले होते. त्यानंतर बाळाच्या खोलीलादेखील छान सजवले होते. पण, यात मी माझ्याकडे लक्षही देत होते. यासाठी मी एक कॅम्पेनदेखील केले.

  • तू गर्भधारणेशी संबंधित मिथक ऐकले आहे?

मला असे वाटते की, आपली सोसायटी आणि कुटुंबातील सर्व लोक सल्ला देतात की, गर्भधारणेदरम्यान काय करावे आणि काय करू नये. हे काही चुकीचे नाही. ते संभ्रमात टाकण्यासाठी असे काही करत नाहीत तर ते त्यांच्या अनुभवातून बऱ्याच गोष्टी सांगतात. त्यात काही मिथक नसते. तरीदेखील तुम्हालाच ठरवावे लागते की, काय चांगले आहे? मग तो घरातून बाहेर न पडण्याचा निर्णय असो किंवा बेबी बंप न दाखवण्याचा निर्णय असो. तुम्हाला तुमचे बेबी बंप दाखवायचे आहे तर नक्की दाखवा. तुम्हाला घरी बसून आनंद घ्यायचा आहे, पलंगावर बसून जेवण करायचे आहे, चित्रपट पाहायचा आहे तर तेदेखील योग्य आहे. यातील कोणत्या गोष्टींचे पालन करावे आणि कोणत्याचे करू नये हे तुमच्यावर अवलंबून आहे

  • गर्भवती असताना तू कोणती काळजी घेतली होती?

मी सर्वप्रथम पोषक खाद्यपदार्थ खाण्यावर फोकस केले होते. जे माझ्यासाठी आणि बाळासाठी आवश्यक होते. ज्यावेळी बाळ जन्माला येते त्यावेळी तुमच्या शरीरात तेवढी ताकद पाहिजे की, तुम्ही त्याची चांगली काळजी घेऊ शकाल. मी पोषक आहारासोबतच थोडेफार फास्ट फूडदेखील खाल्ले होते, कारण कधीकधी असे करण्यासाठी मनातून आवाज येत असतो. जर तसे तुम्ही केलेत तर मनाला आनंद होतो आणि ओघाने तुमच्या बाळाला जाणवतो.

  • शाहिद कशाप्रकारे तुझी काळजी घेत होता?

माझ्या मते ज्यावेळी तुम्ही गर्भवती असता त्यावेळी स्वत:कडे एकटीने लक्ष देण्यापेक्षा आपल्या जोडीदारासह प्लॅन करणे चांगले असते. तुमच्या पोटात अजून एक जीव असतो त्यामुळे स्वत:सोबत अजून कुणाची साथ असणे महत्त्वपूर्ण असते. शाहिद प्रत्येकवेळी माझ्यासोबतच होता. मी त्याच्याशिवाय हा गर्भधारणेचा टप्पा पारच करू शकले नसते. आई-वडील मिळून येणाऱ्या बाळासाठी जे काही करू शकतात त्याचा आनंद शब्दात सांगताच येत नाही.

  • तुम्हा दोघांना कशा पालकत्वावर विश्वास आहे?

यातही आमची भागीदारी आहे. शाहिद खूप नरमाईने मुलांना सांभाळतो, परंतु मी मात्र मुलांबाबत जरा कडक राहते.

बातम्या आणखी आहेत...