आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मीरा राजपूतची आपबीती:दात काढताना प्रसुती वेदनेपेक्षा जास्त वेदना झाल्या, म्हणाली - 'शाहिद जवळ असता तर त्याच्या हाताची वाट लागली असती'

18 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • मीराने शनिवारी एक पोस्ट शेअर केली आहे.

अभिनेता शाहिद कपूर आणि मीरा राजपूत बॉलिवूडमधील लोकप्रिय जोडप्यांपैकी एक आहेत. 2015 मध्ये दोघांनी लग्न केले. त्यांना मीशा आणि जेन ही दोन मुले आहेत. शाहिद पत्नी मीरा आणि मुलांसोबतची छायचित्रे कायम सोशल मीडियावर शेअर करत असतो. मात्र, आता मीराने शनिवारी एक पोस्ट शेअर केली आहे. यात तिने दात काढताना प्रसुती वेदनेपेक्षा जास्त वेदना झाल्या, असे सांगितले आहे.

इतकेच नाही तर यावेळी जर शाहिद सोबत असता तर त्याच्या हाताची वाट लागली असती, असेही ती म्हणाली आहे. तिने सांगितल्यानुसार, दोन्ही प्रसूतीच्या वेळी कळ सहन करताना तिने शाहिदचा हात धरुन ठेवला होता आणि यावेळी त्याचा हात जवळपास फ्रॅक्चर झाला होता.

दात काढताना होणा-या वेदनांपुढे प्रसुती वेदना एका योगा स्ट्रेचप्रमाणे आहेत

झाले असे की, मीरा शुक्रवारी दात काढण्यासाठी डॉक्टरांकडे गेली होती. मात्र यावेळी शाहिद तिच्यासोबत नव्हता. यावेळी तिने शाहिदला खूप मिस केल्याचे तिने सांगितले आहे. तिने दात काढताना होणा-या वेदना आणि प्रसुती वेदना यांच्यात तुलना केली आहे. यासह तिने एक फोटोदेखील शेअर केला आहे.

मीराने पोस्टमध्ये लिहिले, "आज मी माझा दात काढून घेण्यासाठी डॉक्टरांकडे गेले होते. या वेदनेसमोर मला लेबर पेन योगा स्ट्रेचसारखे वाटले. दात काढताना शाहिदला मी खूप मिस केले. जर तो आज माझ्यासोबत असता तर आज त्याच्या हाताची वाट लागली असती. कारण माझ्या दोन्ही प्रसुतीवेळी मी शाहिदचे हात जवळजवळ फ्रॅक्चर केले होते," असा अनुभव मीराने शेअर केला आहे.

प्रत्येक पावलावर तुमच्या जोडीदाराचा पाठिंबा खूप महत्त्वाचा असतो. त्यामुळे मी शांत आणि आनंदी राहू शकले असेही मीराने सांगितले.