आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशाहिद कपूर काही दिवसांपूर्वी गोव्यात एका वेब सीरिजचे शूटिंग करत हाेता. दिव्य मराठीच्या हाती या सीरिजशी जोडलेली काही माहिती लागली आहे. सेटवरील उपस्थित लोकांनी सांगितले, ज्याप्रमाणे बोलले जात होते की या प्रोजेक्टचे नाव ‘अश्वलिंगा’ आहे. मात्र तसे नाही. हा वेगळा प्रोजेक्ट आहे. यावरदेखील दिग्दर्शक जोडी राज आणि डीकेच काम करत आहेत. गोव्यात शूट होणाऱ्या या वेब सीरिजचे नाव ‘फेक’ आहे. या सीरिजमधून अनेक वर्षांनंतर अष्टपैलू कलाकार अमोल पालेकरदेखील पुनरागमन करत आहेत.
गोव्यात सीरिजच्या दुसऱ्या शेड्यूलचे सुमारे एका महिन्याचे शूटिंग होणार होते मात्र टीम फक्त 10 ते 12 दिवसाचे शूटिंग करू शकली. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे टीमला पॅकअप करावे लागले. 30 दिवसांचे शूटिंग फक्त 10 ते 12 दिवसात पूर्ण करावे लागले. त्यासाठी सेटवर फक्त 100 लोकांची उपस्थिती असायची. सर्वांनाच जवळच्या 14 विलाच्या रिसॉर्टमध्ये बायोबबलमध्ये ठेवण्यात आले होते. दरम्यान, कोणालाच कोराेना झाला नाही तरीदेखील निर्मात्यांनी खबरदारी म्हणून शूटिंग थांबवले.
आतापर्यंत सीरिजचे शूटिंग गोव्यात करण्यात आले पुढे याचे शूटिंग कुठे होईल हा मोठा प्रश्न त्यांच्यापुढे आहे. कथा मुंबईच्या पार्श्वभूमीवर आधारित आहे. मात्र तेथे टोटल लॉकडाऊनमुळे शूटिंग होऊ शकत नव्हते. त्यामुळे गोव्यात मुंबईचा सेट उभारून शूटिंग केली जात हाेती. आता गोव्यातही कोरोनाने पाय पसरले आहेत. त्यामुळे पुढचे शूटिंग दुसऱ्या लोकेशनवर केले जाईल.
ही सीरिज दोन सीझनमध्ये रिलीज हाेणार आहे. प्रत्येक सीझनमध्ये आठ भाग असतील. याच्या प्रत्येक भागाचे बजेट सात ते आठ कोटी रुपये आहे. एकट्या शाहिदलाच निर्मात्यांनी 80 कोटींमध्ये साइन केले आहे. आतापर्यंत दोन ते तीन भागाचे कंटेंट चित्रित केले आहे. निर्माते सीझनचे शूटिंग 100 दिवसांत पूर्ण करणार आहेत.
शाहिदचे पात्र या सीरिजमध्ये नकली नोट छापणारे असते. हे काम त्याने आपल्या आजोबाकडून वारशात शिकलेले असते. अशा प्रकारे नकली नोटांचा धंदा करण्यासोबतच यात आजोबा आणि नातवाचे चांगले नाते दाखवले आहे. खरं तर शाहिदच्या पात्राच्या आजोबाची अापल्या जमान्यात एक प्रिंटिंग प्रेस होती. पुढे चालून शाहिदचे पात्र त्या प्रिंटिंग प्रेसच्या मशीनमधून नकली नोट छापणे सुरू करते. सीरिजमध्ये शाहिदच्या आजोबाची भूमिका अमोल पालेकरने साकारली आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.