आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रिलीज डेट ठरली:शाहिद कपूरच्या 'जर्सी' चित्रपटाच्या प्रदर्शनाची नवीन तारीख ठरली, यंदा दिवाळीच्या मुहूर्तावर प्रदर्शित होणार चित्रपट

7 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • 'जर्सी दिवाळीच्या मुहूर्तावर 5 नोव्हेंबर 2021 रोजी चित्रपटगृहात येतोय.

अभिनेता शाहिद कपूर लवकरच 'जर्सी' या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. महिन्याभरापूर्वीच या चित्रपटाचे चित्रीकरण पूर्ण झाले होते. मात्र अद्याप चित्रपट कधी प्रदर्शित होणार हे समोर आले नव्हते. मात्र आता स्वतः शाहिदने चित्रपट कधी प्रदर्शित होणार हे आपल्या चाहत्यांना सांगितले आहे. यावर्षी दिवाळीच्या मुहूर्तावर हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

शाहिदने अलीकडेच आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर चित्रपटातील आपला नवीन लूक आणि रिलीज डेट शेअर केली आहे. हा चित्रपट 5 नोव्हेंबरला सिनेमागृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. 'जर्सी दिवाळीच्या मुहूर्तावर 5 नोव्हेंबर 2021 रोजी चित्रपटगृहात येतोय. एक असा प्रवास ज्याचा मला अभिमान आहे. हे माझ्या टीमसाठी...', अशी पोस्ट शाहिदने शेअर केली आहे.

चित्रीकरण पूर्ण झाल्यानंतर शाहिदने शेअर केली होती इमोशनल पोस्ट
‘जर्सी’ हा चित्रपट क्रिकेट या खेळावर आधारित आहे. गेल्या दोन वर्षांपासून या चित्रपटाची चर्चा आहे. खरं तर जर्सी 2020 मध्येच प्रदर्शित होणार होता. परंतु कोरोना विषाणूच्या वाढत्या संक्रमणामुळे चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्यात आली होती. शिवाय चित्रीकरणही मध्यंतरी थांबवण्यात आले होते. मात्र लॉकडाऊननंतर चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात झाली होती. गेल्याच महिन्यात चित्रपटाचे चित्रीकरण पूर्ण झाले होते. याची माहिती देताना शाहिदने सोशल मीडियावर फोटोसह एक भावनिक नोट शेअर केली होती. शाहिदने शेअर केलेल्या फोटोत तो चित्रपटाचे शूटिंग पूर्ण झाल्याच्या निमित्ताने टीमबरोबर केक कापून सेलिब्रेशन करताना दिसला होता. '14 डिसेंबर 2019 ते 14 डिसेंबर 2020 पर्यंत... ही माझी ड्रीम टीम आहे आहे. मी टीममधील प्रत्येक सदस्याचे आभार मानतो', अशा आशयाचे कॅप्शन शाहिदने दिले होते.

शाहिदने आणखी एक फोटो शेअर केला होता आणि लिहिले होते, 'जर्सी'चे चित्रीकरण पूर्ण झाले आहे. कोविडच्या काळात 47 दिवसांचे शूट पूर्ण झाले. हे अविश्वसनीय आहे. मला संपूर्ण टीमचा अभिमान आहे. हे चमत्कारापेक्षा कमी नाही. स्वतःचा जीव धोक्यात टाकून दररोज सेटवर येणे आणि आपण ज्यावर प्रेम करतो, ते काम करत राहणे... यासाठी मी युनिटमधील प्रत्येक सदस्याचे आभार मानू इच्छितो', असे शाहिद म्हणाला होता.

तेलुगू चित्रपटाचा रिमेक आहे 'जर्सी'
शाहिद तेलुगू चित्रपटाचा हिंदी रिमेक असलेल्या 'जर्सी' या चित्रपटाच मुख्य भूमिका साकारताना दिसणार आहे. या चित्रपटात शाहिद कपूर निवृत्त क्रिकेटपटूच्या भूमिकेत दिसणार आहे. जो आपल्या कमबॅकसाठी प्रयत्न करतो. या चित्रपटात शाहिद व्यतिरिक्त मृणाल ठाकूर आणि ज्येष्ठ अभिनेते पंकज कपूर मुख्य भूमिका साकारणार आहेत. अमन गिल, दिल राजू आणि अल्लू अरविंद यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे.

बातम्या आणखी आहेत...