आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशहनाज गिलच्या टॉक शोमध्ये नुकतीच अभिनेता अभिनेता आयुष्मान खुराणाने हजेरी लावली होती. यावेळी त्याच्याशी बोलताना शहनाज म्हणाली की, तिच्या आयुष्यात अनेक भावनिक क्षण आले आहेत, परंतु तिने याबद्दल कधी कोणाला सांगितले नाही, कारण लोकांना वाटते की ती सहानुभूती मिळविण्यासाठी हे सर्व करत आहे. हे सांगितल्यानंतर शहनाजला तिच्या भावनांवर नियंत्रण ठेवता येत नाही आणि तिला अश्रू अनावर झाले. तिला पाहून आयुष्मानलाही इमोशन झालेला दिसला. .
शहनाज तिच्या भावना व्यक्त करत नाही
बिग बॉस 13 मध्ये आपल्या क्यूट लूक आणि दिवंगत अभिनेता सिद्धार्थ शुक्लासोबतच्या नात्यामुळे शहनाज गिल नेहमीच चर्चेत राहिली. अलीकडेच तिने 'देशी वाइब्स विथ शहनाज गिल' हा चॅट शो लॉन्च केला आहे. या शोच्या आगामी एपिसोडमध्ये तिने आयुष्मान खुराणाला आमंत्रित केले होते. यादरम्यान दोघांनी वेगवेगळ्या विषयावर गप्पा मारल्या. यावेळी आयुष्मान शहनाजला म्हणाला - "तू खूप धैर्यवान आहेस कारण तुला जे बोलायचे आहे ते बोलते." याला उत्तर देताना शहनाज म्हणाली की ती आता आपल्या भावना व्यक्त करत नाही.
लोकांना वाटते की, मी सहानुभूती घेते
शहनाज म्हणाली- "माझ्या आयुष्यातही अनेक भावनिक क्षण आले आहेत, पण मी कधीच कोणाला सांगत नाही. कारण लोकांना वाटते की मी सर्वांची सहानुभूती मिळवण्यासाठी या गोष्टी करत आहे." हे बोलल्यावर शहनाज रडायला लागते. शहनाजला रडताना पाहून आयुष्मानही भावूक होतो.
सिद्धार्थ शुक्लाच्या निधनानंतर कोलमडली होती शहनाज
बिग बॉस 13 मध्ये शहनाज गिल आणि सिद्धार्थ शुक्ला यांची जवळीक वाढली होती. दोघांनी कधीही अधिकृतपणे त्यांचे नाते स्वीकारले नाही, परंतु दोघेही एकमेकांच्या खूप जवळ होते. 2 सप्टेंबर 2021 रोजी सिद्धार्थ शुक्ला याचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले, त्यानंतर शहनाज पूर्णपणे तुटली. या दु:खातून सावरण्यासाठी तिला खूप वेळ लागला, पण हळूहळू ती या कठीण परिस्थितीतून बाहेर पडली.
शहनाजने अलीकडेच सिद्धार्थ शुक्लाला श्रद्धांजली वाहत एक गीत देखील समर्पित केले आहे. याशिवाय तिने स्वत:चा टॉक शो सुरू केला आहे तसेच ती सलमान खानच्या 'किसी का भाई किसी की जान' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.