आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ट्रोलिंग:चाहत्याचा फोन हिसकावल्याने शहनाज गिल झाली ट्रोल, युजर्स म्हणाले- किती ओव्हर अ‍ॅक्टिंग करते!

3 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहनाज गिलने काल रात्री नवाजुद्दीन सिद्दीकी आणि नेहा शर्मा यांच्या 'जोगिरा सारा रा रा' या चित्रपटाच्या स्क्रिनिंगला हजेरी लावली होती. या प्रसंगाशी संबंधित एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये शहनाज एका चाहत्याचा फोन हाताने ओढताना दिसत आहे.

पारंपरिक लूकमध्ये सुंदर दिसली

या व्हिडिओमध्ये शहनाज पारंपरिक लूकमध्ये दिसत आहे. तिने ऑफ व्हाइट कुर्ता सेटसोबत गुलाबी रंगाचा दुपट्टा घातला होता. ती बाहेर येताच तिच्यासोबत सेल्फी घेण्यासाठी चाहत्यांची गर्दी झाली होती. यादरम्यान, एक चाहता त्याच्या फोनसह फोटो क्लिक करत होता, तेव्हा शहनाजने त्याच्या हातातून फोन हिसकावला आणि सेल्फी काढण्यास सुरुवात केली. यानंतर शहनाज तिच्या कारमधून निघून गेली.

युझर्सनी केले ट्रोल
हा व्हिडिओ समोर येताच चाहत्यांनी शहनाजला या वागणुकीसाठी ट्रोल करण्यास सुरुवात केली. व्हिडिओवर कमेंट करताना एका युझरने लिहिले की, 'ओव्हरअ‍ॅक्टिंग'. आणखी एका युझरने लिहिले की, 'कितनी ओवरअ‍ॅक्टिंग करती है ये फालतू में'. तर तिसऱ्या युझरने लिहिले की, 'प्रत्येकजण यश आणि प्रसिद्धी योग्यरीत्या हाताळू शकत नाही.' मात्र, अनेकांनी तिचा बचावही केला.

शहनाज गिलची वर्कफ्रंट

शहनाज गिलच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, ती यापूर्वी सलमान खान, पूजा हेगडे आणि दग्गुबती व्यंकटेश यांच्या 'किसी का भाई किसी की जान' या चित्रपटात दिसली होती. शहनाज तिच्या चॅट शो देसी वाइब्समुळेही चर्चेत आहे.

आता ती लवकरच साजिद खान दिग्दर्शित 100% या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात शहनाज, नोरा फतेही आणि रितेश देशमुखसोबत स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे. याशिवाय तिच्याकडे रिया कपूरचा आगामी चित्रपटही आहे.