आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Entertainment
  • Bollywood
  • Shahnaz Gill Tried To Commit Suicide After A Fight With Himanshi, The Viral 'Kya Karoon Main Maroon' Dialog Goes ViralShahnaz Gill Tried To Commit Suicide After A Fight With Himanshi, The Viral 'Kya Karoon Main Maroon' Dialog Goes Viral

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

हॅपी बर्थडे पंजाबची कतरिना कैफ:हिमांशीसोबतच्या भांडणानंतर शहनाज गिलने केला होता आत्महत्येचा प्रयत्न, 'क्या करूं मैं मर जाऊं' डायलॉगने झाली पुन्हा प्रसिद्ध

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • यशराज मुखातेने शहनाजच्या एका संवादावर एक रॅप साँग तयार केले आहे, जे सध्या प्रचंड गाजत आहे.

पंजाबी मॉडेल आणि गायिका शहनाज गिल हिला बिग बॉस 13 या वादग्रस्त शोमधून प्रचंड लोकप्रियता मिळाली आहे. सिद्धार्थ शुक्लासोबतच्या रोमान्सपासून ते मजेशीर गप्पापर्यंत, शहनाज गिल अनेक कारणांमुळे चर्चेत राहिली आहे. अलीकडेच प्रसिद्ध म्युझिक क्रिएटर यशराज मुखातेने शहनाजच्या एका संवादावर एक रॅप साँग तयार केले आहे, जे सध्या प्रचंड गाजत आहे. बिग बॉसमधून मिळालेल्या प्रसिद्धीपूर्वी शहनाज तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे बर्‍याच वादात सापडली आहे. पाहुया पंजाबची कतरिना कैफ म्हणून ओळखल्या जाणा-या शहनाज गिलचा प्रवास-

मॉडेलिंगद्वारे करिअरची सुरूवात
शहनाज गिलने मॉडेलिंगद्वारे आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली. काही सौंदर्य स्पर्धांमध्ये सहभागी झाल्यानंतर शहनाजला 2015 मध्ये गुरविंदर बरारच्या 'शिव दी किताब' आणि कंवर चहलच्या 'माझे दी जट्टी' म्युझिक व्हिडिओमध्ये झळकण्याची संधी मिळाली. यानंतर ही अभिनेत्री पंजाबी संगीत इंडस्ट्रीचा एक प्रसिद्ध चेहरा बनली.

हिमांशीसाठी केले होते आक्षेपार्ह वक्तव्य

बिग बॉस 13 मध्ये दिसण्यापूर्वी हिमांशी खुराना आणि शहनाज गिल परस्पर शत्रुत्वामुळे वादात सापडल्या होत्या. शहनाज गिलने स्नॅपचॅटवर लाइव्ह येऊन हिमांशी खुरानाचे 'आय लाइक इट' हे गाणे आतापर्यंतचे सर्वात वाईट गाणे असल्याचे म्हटले होते. शहनाजने हिमांशीसाठी आक्षेपार्ह शब्दांचा वापर केला होता. याचे प्रत्यूत्तर देताना हिमांशी खुरानाने आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर लाइव्ह येऊन तिला सडेतोड उत्तर दिले होते.

हिमांशीने बिग बॉसमध्ये खुलासा केला होता की, शहनाजला गिलला तिच्या प्रियकराने रस्त्यावर सोडले होते, त्यावेळी तिने तिची मदत केली होती. हिमांशी शहनाजला आपल्या घरी घेऊन गेली आणि तिच्या टीमला तिला खाऊपिऊ घालायला सांगितले. काही दिवसांनंतर शहनाजने तिच्याविषयी सोशल मीडियावर अपमानास्पद बोलणे सुरू केले. त्यावेळी शहनाजला उत्तर देताना हिमांशी म्हणाली होती, जेव्हा तुझ्या प्रियकराने तुला रस्त्यावर सोडले होते, तेव्हा मी तुझी मदत केली, पण तू कृतघ्न आहेस, डायन भी 7 घर छोड़ कर वार करती है, किस स्कूल में पढ़ी है तू।.. असे हिमांशी शहनाजला उद्देशून म्हणाली होती.

हिमांशीच्या या व्हिडिओनंतर दोघांनी एकमेकांविषयी आक्षेपार्ह बोलायला सुरुवात केली होती.

हिमांशीमुळे शहनाजने केला होता आत्महत्येचा प्रयत्न

शहनाज गिलचे वडील संतोष गिल स्पॉटबॉयला दिलेल्या मुलाखतीत म्हणाले होते की, वादाच्या वेळी हिमांशीने शहनाजला इतके टॉर्चर केले होते की, तिने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. या खुलाशानंतर या दोघी पुन्हा एकदा वादात सापडल्या होत्या.

शहनाजचे वडील संतोष यांच्या खुलाशानंतर हिमांशी सोशल मीडियावर म्हणाली होती, 'तुमच्या मुलीने माझ्यामुळे आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला तर क्षमस्व. परंतु आपण आपल्या मुलीला समजवला, पहिले स्वतःच वादाला तोंड फोडायचे आणि मग स्वतःच डिस्टर्ब व्हायचे याला काही अर्थ नाही.'

यशराज मुखातेचे रॅप साँग झाले व्हायरल

रसोडे में कौन थाचा व्हिडिओ क्रिएटर यशराज मुखातेने शहनाज गिलचा डायलॉग 'क्या करु मैं मर जाऊं'वर रॅप साँग तयार केले होते. हा व्हिडिओ डिसेंबर 2020 मध्ये रिलीज झाला होता. त्याला आतापर्यंत 8 मिलियनहून अधिक लोकांनी पाहिले आहे. हा व्हिडिओ समोर आल्यानंतर शहनाजची जादू पुन्हा एकदा पसरली. बिग बॉस नंतर शहनाज भुला दुंगा, कह गई सॉरी, शोना-शोना, कुर्ता पजामा आणि वादा है या म्युझिक व्हिडिओमध्ये दिसली आहे.