आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शाहरुखने चाहत्यांना दिली खूशखबर:'पठाण'चा दुसरा भाग आणणार असल्याचे दिले संकेत, म्हणाला- पठाण हिट होवो ही प्रार्थना करा

23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शाहरुख खानच्या वाढदिवसानिमित्त त्याच्या बहुप्रतिक्षित ‘पठाण’ या चित्रपटाचा टिझर प्रदर्शित करण्यात आला. टिझर रिलीज झाल्यापासून इंटरनेटवर सर्वत्र या टिझरची चर्चा होत आहे. शाहरुखने आता त्याच्या चाहत्यांना एक आनंदाची बातमी दिली आहे. जर पठाण हिट ठरला तर चित्रपटाचा दुसरा पार्ट आणण्याची तयारी त्याने दर्शवली आहे. पठाणची बॉक्स ऑफिसवरील कामगिरी चांगली राहिल्यास, त्याच्या दुसऱ्या भागाबद्दल नक्कीच विचार करेन असे शाहरुखने म्हटले आहे.

'पठाण' हिट झाला तर त्याचा दुसरा भाग नक्की येईल - शाहरुख

2 नोव्हेंबर रोजी शाहरुखने आपला 57 वा वाढदिवस चाहत्यांसोबत शेअर केला. यादरम्यान आपल्या आगामी 'पठाण' या चित्रपटाविषयी बोलताना तो म्हणाला की, जर प्रेक्षकांना हा चित्रपट आवडला तर तa त्याचा दुसरा भाग बनवण्याचा नक्कीच विचार करेल. शाहरुख त्याच्या चाहत्यांना म्हणाला की, पठाण हा चित्रपट हिट व्हावा यासाठी देवाकडे प्रार्थना करा. जर प्रेक्षकांचा चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळाला तर निर्माते आणि चित्रपटाशी संबंधित सर्व कलाकार सर्वजण मिळून त्याच्या पुढच्या भागाची तयारी सुरू करतील, असे शाहरुखने सांगितले.

चाहते 'पठाण'च्या रिलीजची आतुरतेने बघत आहेत वाट
शाहरुख खानचा गेल्या चार वर्षात एकही मोठा चित्रपट प्रदर्शित झालेला नाही, त्याने या चार वर्षात अनेक मोठ्या चित्रपटात कॅमिओ केले पण त्याचा एकही सोलो चित्रपट प्रदर्शित झालेला नाही. त्याचा शेवटचा सोलो चित्रपट 2018 मध्ये आलेला 'झिरो' हा होता, जो बॉक्स ऑफिसवर काही खास कमाल दाखवू शकला नव्हता. त्यामुळे साहजिकच शाहरुखचे चाहते 'पठाण'च्या रिलीजची आतुरतेने वाट पाहत आहेत.

25 जानेवारी 2023 रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार 'पठाण'
शाहरुख खानच्या अॅक्शन थ्रिलर पठाणमध्ये जॉन अब्राहम आणि दीपिका पदुकोण यांच्याही प्रमुख भूमिका आहेत. यशराज बॅनरखाली बनलेला हा चित्रपट सिद्धार्थ आनंद यांनी दिग्दर्शित केला आहे. हा चित्रपट 25 जानेवारी 2023 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.

बातम्या आणखी आहेत...