आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
बॉलिवूडचा सुपरस्टार शाहरुख खानची लव्ह स्टोरी एखाद्या फिल्मी कथेपेक्षा वेगळी नाही. शाहरुख आणि गौरी यांना बोहल्यावर चढेपर्यंत अनेक चढउतार बघावे लागले. शाहरुखला गौरीच्या कुटुंबाकडून होकार मिळवण्यासाठी बरेच प्रयत्न करावे लागले होते.
शाहरुख मुस्लिम असल्यामुळे गौरीच्या कुटुंबीयांनी आधी त्यांच्या लग्नाला नकार दिला होता. मात्र अखेर गौरीच्या कुटुंबीयांना त्यांच्या प्रेमापुढे नमते घ्यावे लागले आणि शाहरुख-गौरी साता जन्माचे सोबती बनले. दरम्यान दोघांच्या लग्नात एक मजेशीर किस्सा घडला होता. याबद्दल शाहरुखने एका मुलाखतीत सांगितले होते. काही वर्षांपूर्वी अभिनेत्री फरीदा जलाल यांनी शाहरुखची एक मुलाखत घेतली होती, जी सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
शाहरुख म्हणाला- गौरी बुरखा परिधान कर
या व्हिडिओत शाहरुखने त्याच्या वेडिंग रिसेप्शनमध्ये घडलेला किस्सा शेअर केला आहे. तो म्हणाला, 'मला आजही लक्षात आहे मी त्री जवळपास 1.15 ला तेथे पोहोचलो. तिथे गौरीचे सर्व नातेवाईक बसले होते. रिसेप्शनला उपस्थित असलेल्या लोकांमध्ये, मी एक मुस्लिम मुलगा आहे. त्यामुळे लग्नानंतर गौरीचे नाव बदलणार का? आता गौरी मुस्लीम धर्म स्वीकारणार का? अशा चर्चा सुरु असल्याचे माझ्या कानावर आले.''
''मी सर्वांचे बोलणे ऐकत होतो. मी त्यावर प्रतिक्रिया देत म्हणालो, गौरी बुरखा परिधान कर आणि चला आता नमाज पठण करुया. त्यानंतर मी पुढे म्हणाले की आता ती दररोज बुरखा घालून घराच्या बाहेर पडणार आणि आम्ही तिचे नाव आयशा ठेवणार आहोत. ते ऐकून सर्वजण आश्चर्यचकित झाले.'' पण शाहरुखने हे मस्करीमध्ये म्हटले असल्याचे कळाल्यानंतर सर्वांना हसू आले होते असे शाहरुखने या मुलाखतीत सांगितले होते.
25 ऑक्टोबर 1991 रोजी हिंदू रीति-रिवाजांनुसार शाहरुख-गौरीचे लग्न झाले होते. आता या दोघांच्या लग्नाला 29 वर्ष झाली आहेत. आर्यन, सुहाना आणि अबराम ही त्यांच्या मुलांची नावे आहेत.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.