आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रीयुनियन:7 वर्षांनंतर पडद्यावर पुन्हा एकत्र दिसणार शाहरुख खान आणि काजोल, करण जोहरच्या चित्रपटात झळकणार

20 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • स्पेशल साँग किंवा सीनमध्ये दिसणार

करण जोहरचा 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' हा या वर्षातील बहुप्रतिक्षित चित्रपटांपैकी एक आहे. बॉलिवूडची ऑनस्क्रीन सुपरहिट जोडी काजोल आणि शाहरुख खान या चित्रपटात खास भूमिका साकारणार असल्याच्या बातम्या अलीकडेच आल्या होत्या. रोहित शेट्टीच्या 'दिलवाले' या चित्रपटात ही जोडी शेवटची पडद्यावर एकत्र दिसली होती. आता 7 वर्षांनंतर करण जोहरच्या या चित्रपटातून हे दोघे एकत्र दिसणार आहेत. या चित्रपटात आलिया भट्ट आणि रणवीर सिंग यांच्यादेखील प्रमुख भूमिका आहेत.

दोघेही मुंबईत शूट करणार
बॉलिवूड लाईफच्या वृत्तानुसार, शाहरुख आणि काजोल या चित्रपटात स्पेशल अपिअरन्स देणार आहेत. त्यासाठी दोघे लवकरच मुंबईत शूटिंग सुरू करणार आहेत. शाहरुख सध्या त्याच्या प्रोजेक्टमध्ये बिझी आहे. एका जवळच्या सूत्रानुसार, शाहरुख करण जोहरच्या चित्रपटाच्या शूटिंगसाठी एक दिवस सुट्टी घेणार आहे. मात्र, शाहरुख आणि काजोल चित्रपटातील स्पेशल गाण्यात दिसणार की स्पेशल सीनमध्ये हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

स्पेशल साँग किंवा सीनमध्ये दिसणार
सूत्रानुसार, "शाहरुख त्याच्या व्यस्त शेड्युलमधून शूटसाठी एक दिवस काढू शकतो आणि मुंबईतच शूट करू शकतो. अद्याप शाहरुख आणि काजोल चित्रपटातील स्पेशल सीनमध्ये दिसणार की गाण्यात हे अद्याप निश्चित झालेले नाही. करणदेखील खूप दिवसांनी दिग्दर्शक म्हणून परतण्यासाठी खूप उत्सुक आहे."

7 वर्षांनी एकत्र काम करणार

शाहरुखने 2016 मध्ये करण जोहरच्या 'ए दिल है मुश्किल' चित्रपटात स्पेशल अपिअरन्स दिला होता. काजोल आणि शाहरुख शेवटचे 2015 मध्ये रोहित शेट्टीच्या 'दिलवाले'मध्ये दिसले होते. या चित्रपटात 7 वर्षांनंतर दोघेही एकत्र येणार आहेत.

SRK आणि काजोलचे आगामी प्रोजेक्ट्स
वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर शाहरुख खान दीपिका पदुकोण सोबत आगामी 'पठाण' चित्रपटात दिसणार आहे. त्याच्याकडे राज कुमार हिरानीचा 'डंकी', 'धूम 4' आणि 'लायन' हे चित्रपट आहेत. दुसरीकडे, काजोल फिल्ममेकर रेवतीच्या 'सलाम वेंकी' या चित्रपटात दिसणार आहे.

बातम्या आणखी आहेत...