आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'बाजीगर'ला रिलीज होऊन झाली 27 वर्षे:सलमान आणि आमिरनंतर अक्षयनेही 'बाजीगर' करण्यास दिला होता नकार; अभिनेते दिलीप ताहिल यांनी सांगितल्या पडद्यामागील गोष्टी

अमित कर्ण9 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • शाहरुखचे आवडते पात्र होते बाजीगरचा अजय

किंग खान शाहरुखच्या गाजलेल्या बाजीगर या चित्रपटाच्या रिलीजला आज 27 वर्षे पूर्ण झाली आहेत. यानिमित्ताने चित्रपटात खलनायकाची भूमिका साकारणारे अभिनेते दिलीप ताहिल आणि या चित्रपटाचे लेखक रॉबिन भट्ट यांनी चित्रपटाविषयीच्या काही खास गोष्टी दिव्य मराठीला सांगितल्या आहेत.

शाहरुखचे आवडते पात्र होते बाजीगरचा अजय - रॉबिन भट्ट, (बाजीगरचे लेखक)

रॉबिन भट्ट, (बाजीगरचे लेखक)
रॉबिन भट्ट, (बाजीगरचे लेखक)

‘बाजीगर’ आपल्या काळात खूपच बोल्ड चित्रपट हाेता. त्याचा विचार ‘ए किस बिफोर डाईंग’ या पुस्तकातून आला होता. ती 1953 मध्ये आलेली कादंबरी होती. त्याचे आम्ही हिंदीत भाषांतर केले होते. आम्ही कुटुंब, आई-वडील, प्रेमकथा सर्व काही चित्रपटात टाकले हाेते. आमचा हिरो मर्डर्रर होता. अँटी-हिरो ही संकल्पना त्या काळात पहिल्यांदाच आली होती. आम्ही मूळ कथेतून ते घेतले. मी यापूर्वी अब्बास-मस्तानबरोबर चर्चा केली होती. त्यानंतर आमिर, सलमान आणि अक्षय कुमार यांना विचारणा झाली. अक्षय कुमारसोबत अब्बास मस्तान यांनी ‘खिलाडी’ मध्येही काम केले होते. आमिर आणि सलमानप्रमाणे अक्षयनेही अँटी-हिरो त्यांच्या प्रतिमेच्या उलट असल्याचे म्हटले होते.

सलमान त्या काळात इतका मोठा स्टार नव्हता. उभरता कलाकार होता. सलमानचे वडील सलीम साहेब म्हणाले होते, हा खूपच बोल्ड विषय आहे. सलीम साहेब वरिष्ठ आहेत. त्यामुळे आम्ही त्यांचे ऐकले. यात एक दोन महीने गेले. मात्र आम्ही आमच्या कथेवर ठाम होतो. त्यावेळी माझी ओळख शाहरुखसोबत झाली होती. त्यावेळी शाहरुख ‘राजू बन गया जेंटलमन’ शूट करत होता. मी विला हॉटेल खारमध्ये राहत होतो. ते सईद मिर्झा यांना भेटायला आले तर माझ्याकडे येऊन बसत असत. त्यांच्या बोलण्यात व्हिजन दिसत होते. आम्ही बऱ्याच हॉलिवूड चित्रपटाविषयी चर्चा करायचो. ते नवीन होते आणि स्क्रीन इमेजला धरुन बसले नव्हते. यात काहीतरी नवीन आहे, असे ते विचार करायचे. ते सामान्य हिरो प्रमाणे विचार करत नाही. ते स्पष्ट बोलायचे. माझ्याकडे खायला काही नाही. त्यामुळे मी जेव्हा त्यांना बाजीगरचा विषय सांगितला तर त्यांनी पटकन होकार दिला. हिरोइन शिल्पाला मारण्याच्या दृश्यावर सर्वांची सहमती झाली. हिरेाइन मेल्यानंतर पुढे काही सरकते. त्यातही त्यांना काही अडचण नव्हती. तेव्हा शिल्पादेखील नवी होती. त्यांना निर्माते रतन जैन यांनी घेतले हाेते. शाहरुख कथानक वाचनात भाग घ्यायचा. शाहरुखचे हे आवडते पात्र होते. त्यांनीच आपले पात्र तयार केले. पात्र कोणता चष्मा घालणार हे त्यांनीच सुचवले. जॉनी लिव्हरचे पात्र आम्ही तयार केले.

वितरकांनी ‘बाजीगर’ला नकार दिला होता, मात्र शाहरुखने अब्बास मस्तान आणि निर्मात्याला समजावले - दिलीप ताहिल, (चित्रपटात खलनायकाची भूमिका करणार अभिनेता)

दिलीप ताहिल, (चित्रपटात खलनायकाची भूमिका करणार अभिनेता)
दिलीप ताहिल, (चित्रपटात खलनायकाची भूमिका करणार अभिनेता)

‘बाजीगर’चे लेखन आणि दिग्दर्शन कमालीचे होते. राखीसारख्या दिग्गज कलाकारासाेबत काम करायला मिळेल म्हणून मी या चित्रपटाला हाेकार दिला होता. यात नवीन हिरो शाहरुख खान असल्याचे सांगण्यात आले होते. तेव्हा मी शाहरुखसोबत ‘दीवाना’देखील करत होतो. विशेष म्हणजे मी आणि शाहरुखने श्रीपेरंबदूरमध्ये हिरो कंपनीने बनवलेल्या रेसिंग ट्रॅकवर स्वत: कार स्पर्धेत भाग घेतला होता. ट्रॅकवर कार चालवण्याची आम्हाला सूट देण्यात आली होती. त्याचवेळी त्यांचा सिनेमॅटोग्राफर आमचे फोटो घेत होता. त्यावेळी माझ्या आणि शाहरुखमध्ये खरचं कारची स्पर्धा लागली होती.

‘बाजीगर’ प्रत्येक कलाकारासाठी टर्निंग पॉईंट ठरला. लोक मला अजूनही मदन चोप्राच्या नावाने ओळखतात. खरं तर, मी हैदराबादमध्ये ‘सिया के राम’ या मालिकेचे शूटिंग करत होतो, त्यावेळी काही पर्यटक तिथे आले होते. त्यात मी दशरथच्या गेटअपमध्ये होतो. तरीही लोक मला मदन चोप्रा म्हणू लागले. ही अगदी चार वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. मदन चोप्राचा लोकांच्या मनावर खोलवर परिणाम झाला आहे. शिल्पा शेट्टीचा हा पहिला चित्रपट होता. काजोलचा दुसरा. काजोलदेखील लांब शर्यतीसाठी तयार आहे, त्यावेळीच कळाले होते. त्यानंतर चित्रपटाचा ट्रायल शो वितरकांसाठी ठेवण्यात आला.

बाजीगरचे यश

  • शाहरुख खानला सर्वोत्कृष्ट अभिनेता, अनु मलिकला सर्वोत्कृष्ट संगीत दिग्दर्शनासाठी आणि कुमार सानू यांना सर्वोत्कृष्ट पार्श्वगायकासाठी फिल्मफेअर पुरस्कार देण्यात आला.
  • “बाजीगर” हा 1993 मधील सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला होता आणि त्याने जगभरात 13.9 कोटींची कमाई केली.
बातम्या आणखी आहेत...