आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अचिव्हमेंट:स्टायलिश लूक, चेहऱ्यावर हास्य... बॉलिवूड डेब्यूपुर्वीच शाहरुख खानची लेक सुहाना बनली इंटरनॅशनल ब्रँड अ‍ॅम्बेसेडर

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शाहरुख खान व गौरी खान यांची लाडकी लेक सुहाना खान हिला बॉलिवूड पदार्पणापूर्वीच एक मोठी संधी मिळाली आहे. एका इंटरनॅशनल ब्रँडची ती ब्रँड अ‍ॅम्बेसेडर बनली आहे. सुहाना न्यूयॉर्कमधील ब्युटी ब्रँड ‘मेबलिन’ची ब्रँड अ‍ॅम्बेसेडर बनली आहे.

सोमवारी मुंबईत आयोजित एका मीडिया इव्हेंटमध्ये सुहानाच्या संदर्भात ही घोषणा करण्यात आली. सुहाना खान याचवर्षी झोया अख्तरच्या ‘द आर्चीज’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे, पण त्याआधीच तिला एका आंतरराष्ट्रीय ब्रँडची ब्रँड अ‍ॅम्बेसेडर बनण्याची संधी मिळाली आहे. या इव्हेंटमधील अनेक व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या कार्यक्रमात सुहानाने पहिल्यांदाच मीडियाशी संवादही साधला. यावेळी रेड कलरच्या आउटफिटमध्ये सुहाना खूपच सुंदर दिसत होती.

हा माझ्यासाठी मोठा सन्मान
यावेळी माध्यमांशी बोलताना सुहाना म्हणाली, "सर्वांना नमस्कार, मी येथे येऊन खूप उत्साहित आहे, या प्रोडक्टसाठी आम्ही जे काही शूट केले आहे ते तुम्ही लवकरच पाहावे, अशी माझी इच्छा आहे. हा माझ्यासाठी खूप मोठा सन्मान आहे. ब्रँड अ‍ॅम्बेसेडर म्हणून या ब्रँडचा एक भाग बनून मला खूप आनंद होत आहे."

लवकरच चित्रपटात झळकणार
सुहाना खान लवकरच नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणाऱ्या 'द आर्चीज' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. झोया अख्तर दिग्दर्शित या चित्रपटाचे शूटिंग पूर्ण झाले आहे. या चित्रपटाद्वारे बोनी कपूर आणि श्रीदेवी यांची लेक खुशी कपूर आणि अमिताभ बच्चन यांचा नातू अगस्त्य नंदाही चित्रपटसृष्टीत पदार्पण करत आहेत. 'द आर्चीज' हा नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणारा सिक्वेल चित्रपट आहे. या चित्रपटाची कथा 1960 च्या दशकातील आहे. हा चित्रपट कॉमिक बुकमधील पात्र आर्ची एंड्रयूज आणि त्याचे मित्र यावर आधारित आहे. या चित्रपटात झोया अख्तरने कॉमिक बुकमधील पात्रांना भारतीय लूक देण्याचा प्रयत्न केला आहे.