आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअभिनेता शाहरुख खान सतत चर्चेत असतो. नुकताच तो 'पठाण' चित्रपटाचे शूटिंग स्पेनमधील शेड्युल पूर्ण करुन परतला. त्यानंतर आता तो राजकुमार हिराणी यांच्या चित्रपटाच्या तयारी आणि शूटिंगमध्ये बिझी झाला आहे. हे सर्व तो 'झिरो'च्या दीर्घ गॅपनंतर करतोय. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर अपेक्षेप्रमाणे कमाल करू शकला नव्हता.
अशा परिस्थितीत, तेव्हापासून सतत अफवा पसरल्या होत्या की, त्या चित्रपटाची कथा वेगळी होती, परंतु शाहरुख बोर्डवर आल्यानंतर त्याने त्याच्यानुसार स्क्रिप्टमध्ये बदल केले. त्याच्यावरील या आरोपांची दिव्य मराठीने चौकशी केली. यासंदर्भात आम्ही चित्रपटाचे लेखक हिमांशू शर्मा यांच्याशी बोललो. त्यांनी मात्र शाहरुखवरचे आरोप स्पष्टपणे फेटाळून लावले आहे.
स्तुती आणि सत्य दोन्ही स्वीकारले पाहिजे
हिमांशू सांगतात, "शाहरुखवरील क्रिएटिव्ह हस्तक्षेपाचे आरोप पूर्णपणे निराधार आहेत. 'झिरो'मध्ये जे काही चांगले किंवा वाईट घडले ते सर्व माझे आहे. मी आयुष्यात कधीच अशा गोष्टी स्वीकारायला लाजलो किंवा घाबरलो नाही. जर कोणी आपली स्तुती केली, तर मी त्याचे मनापासून आभार मानतो, त्याचप्रमाणे जर कोणी खरे बोलले आणि वाईट कृत्य आहे असे म्हटले तर मी ते मनापासून स्वीकारतो. निकाल आपल्या हातात असू शकत नाहीत. म्हणून स्तुती आणि सत्य दोन्ही मोठ्या मनाने स्वीकारायला हवे."
शाहरुख इतरांपेक्षा खूप वेगळे आहेत
हिमांशू म्हणाले, "झिरोनंतर आम्हाला पुन्हा एकदा शाहरुखसोबत काम करायचे आहे. ते सध्या खूप बिझी आहेत. सध्या आम्ही दोन-तीन वेगवेगळ्या प्रोजेक्टमध्ये व्यस्त आहोत. ते इतरांपेक्षा खूप वेगळे आहे. माझ्या आयुष्यात ते सर्वोपरी आहेत."
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.