आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराबॉलिवूडचे ट्रॅजेडी किंग दिलीप कुमार यांचे 7 जुलै रोजी मुंबईतील हिंदुजा हॉस्पिटलमध्ये निधन झाले. त्यांना अखेरचा निरोप देण्यासाठी बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटी त्यांच्या घरी पोहोचले होते. दरम्यान, अभिनेता शाहरुख खाननेही दिलीप कुमार यांच्या घरी जाऊन त्यांच्या पत्नी सायरा बानो यांचे सांत्वन केले. यावेळी ज्या गोष्टींकडे सर्वांचे लक्ष वेधले गेले ते म्हणजे शाहरुख घराच्या आतसुद्धा सनग्लासेस घालून सायरा बानो यांच्या जवळ बसला होता. ही छायाचित्रे समोर येताच लोकांनी सोशल मीडियावर किंग खानला ट्रोल करायला सुरुवात केली.
किंग खानचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे, ज्यामध्ये ती सायरा बानो यांचे सांत्वन करताना दिसत आहे. यावेळी तो पांढ-या रंगाचे टी-शर्ट, जीन्समध्ये होता आणि त्याने डोळ्यांवर सनग्लासेस लावले होते. शाहरुख खान घराच्या आत सनग्लासेस घालून स्टाईलमध्ये बसलेला पाहून एका ट्रोलरने लिहिले की, 'अंत्य दर्शनाला सनग्लासेस घातले आहेत? बॉलिवूड खोटे आहे'. तर आणखी एका ट्रोलरने म्हटले की, 'मास्क घातला नाही, पण सनग्लासेस नक्कीच घातले आहेत आणि तेदेखील घराच्या आत. हे लोक विज्ञानाच्या पलीकडे आहेत'. आणखी एक ट्रोलर म्हणाला, 'सांत्वन करायला आला की एखाद्या पार्टीला? सनग्लासेससुद्धा काढले नाहीत.'
समर्थनार्थ पुढे आले शाहरुखचे चाहते
एकीकडे शाहरुखला काही जण ट्रोल करत आहेत, तर काही जण असेही आहेत, जे शाहरुखच्या बचावासाठी पुढे आले आहेत. एका नेटक-याने शाहरुखच्या समर्थनार्थ लिहिले की, 'अंत्यसंस्काराला कोण कसा दिसतो याने काही फरक पडत नाही. कदाचित तो एखाद्या शूटिंगवरून थेट आला असावा किंवा तो त्याच्या घरापासून दूर असेल. लोकांच्या अशा प्रतिक्रिया त्यांचे खुंटलेले विचार दर्शवतात. महत्त्वाचे हे आहे की, शाहरुख आणि इतर लोक मृत व्यक्ती आणि त्याच्या कुटुंबाचा किती आदर करतात.'
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.