आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

किस्सा:शाहरुख खानने केली होती दिनेश कार्तिकची मदत, क्रिकेटर म्हणाला - त्याने स्वखर्चाने माझ्यासाठी खासगी जेटची व्यवस्था केली होती

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • एसआरकेने कार्तिकसाठी खासगी विमानाची व्यवस्था केली होती

कोलकाता नाईट रायडर्सचा माजी कर्णधार दिनेश कार्तिकने एका मुलाखतीदरम्यान शाहरुख खानने केलेल्या मदतीचा एक किस्सा सांगितला. कार्तिक 2018 पासून या फ्रँचायझीशी जुळला आहे. कार्तिकने खुलासा करताना सांगितले की, एक वेळ असा होता जेव्हा तो वैयक्तिक आयुष्यात अतिशय कठीण परिस्थितीतून जात होता, तेव्हा एसआरकेने त्याला मदत केली होती.

एसआरकेने कार्तिकसाठी खासगी विमानाची व्यवस्था केली होती

कार्तिक म्हणाला, "जगात शाहरुखसारख्या मोठ्या मनाचे लोक नाहीत. आणि जगाला त्याच्यासारख्या अधिक लोकांची आवश्यकता आहे. तो अतिशय खरा आहे, आणि तो तुमची काळजी घेतो. माझ्या वैयक्तिक आयुष्यात अडचणी असताना त्याने माझ्या माणसांना स्वत:च्या खर्चाने खासगी विमानातून चेन्नईतून दुबईत पाठवले होते."

कार्तिकला याची अपेक्षा नव्हती
कार्तिक पुढे म्हणाले, "मला माहित नाही की किती फ्रेंचायझी असे काहीतरी करतील. परंतु माझ्यासाठी ते अविश्वसनीय होते. मला याची अपेक्षा नव्हती. मी माझ्या आयुष्यात कधीही खासगी विमानाने प्रवास केलेला नाही. शाहरुखने माझ्यासाठी मदतीचा हात पुढे केला. आणि त्याने पूर्णपणे माझे मन जिंकले. मी त्याच्यासाठी काहीही करु शकतो, तो एक अद्भूत व्यक्ती आहे. "

कार्तिकने शाहरुखसोबतच्या आपल्या बाँडबद्दल सांगितले
कार्तिकने शाहरुखसोबतच्या बाँडविषयी सांगितले की, त्यांनी दोघांनी त्रिनिदादमध्ये एकत्र जेवण केले होते. कार्तिक म्हणाला, "त्याने मला त्रिनिदाद येथे पाठवले. तो तेथे काही दिवसांसाठी आला होता. सीपीएलमध्ये त्यांची एक टीम होती, ज्याला ट्रिनबागो नाइट रायडर्स असे म्हटले जाते. तिथे मी त्याच्याबरोबर जेवण केले होते," अशी आठवण कार्तिकने सांगितली. ​​​​​​

कार्तिकने सांगितले की, त्रिनिदादमध्ये शाहरुखची प्रचंड मोठी फॅन फॉलोइंग आहे
कार्तिकने सांगितले, “मी त्रिनिदादच्या रस्त्यावर वडा पाव खाल्ले आहेत. त्रिनिदादमध्ये शाहरुखचे खूप चाहते आहेत. मी त्याच्याबरोबर घालवलेला वेळ खूप छान होता."

बातम्या आणखी आहेत...