आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कलाकारांचे वर्क-फॉर्म-होम:शूटिंगवर परतला शाहरुख खान, मन्नतच्या बाल्कनीमध्ये चित्रीकरण करताना दिसला

मुंबई2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • शाहरुख बाल्कनीतून बाहेर बघत काही संवादही बोलताना दिसतोय.

लॉकडाऊननंतर सर्व चित्रपट, जाहिराती आणि वेब सीरिजचे शूटिंग थांबविण्यात आले होता.  मात्र तीन महिन्यांनंतर आता चित्रीकरणाला सुरुवात झाली आहे. बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खानने अनलॉकनंतर पहिल्यांदा चित्रीकरण केले आहे. यावेळी शूटिंगची टीम शाहरुखच्या मन्नत या बंगल्यावर पोहोचली होती. मन्नतच्या बाल्कनीतच सेटअप लावण्यात आला होता.

अलीकडेच शाहरुखची काही छायाचित्रे आणि व्हिडिओ बॉलिवूडचे पापाराझी विरल भयानी यांनी शेअर केले आहेत, ज्यात अभिनेता आपल्या बाल्कनीत घोषणा देताना तर कधी आपले केस सावरताना दिसतोय. शाहरुख बाल्कनीतून बाहेर बघत काही संवादही बोलताना दिसतोय. आणि त्याचे हे सर्व शॉट पाठमोरे चित्रीत करण्यात आले आहेत.

बाल्कनीत झालेल्या शूटिंगदरम्यान शाहरुखबरोबर मोजकेच लोक उपस्थित होते. शूटिंग दरम्यान त्याने चेक शर्ट, डेनिम जीन्ससह डार्क शेडचे सनग्लासेस घातले होते. शाहरुखने हे चित्रीकरण कशासाठी केले, याचा अद्याप उलगडा झालेला नाही.

 

या स्टार्सनी घरीच केले चित्रीकरण 

शाहरुख खानच्या आधी लॉकडाऊनमध्ये जनजागृती करण्यासाठी अनेक स्टार्सनी घरी राहूनच चित्रीकरण केले होते. ज्यात वरुण धवन, सारा अली खान, विक्की कौशल, सिद्धार्थ मल्होत्रा ​​सारख्या अनेक स्टार्सचा समावेश आहे. याशिवाय अमिताभ बच्चन आपल्या घरातूनच  केबीसी 12 चे शूटिंगही करत आहेत.

बातम्या आणखी आहेत...