आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पठाण:शाहरुख खानने व्हिडिओ शेअर करून दाखवला अ‍ॅक्शन अवतार, चाहता म्हणाला - 'पठाण'मध्ये तुझा लूक कसा असेल त्याची मी कल्पना करतोय

6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • व्हिडिओ शेअर करत शाहरुखने एक मजेशीर कॅप्शन दिले आहे

बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानने नुकताच सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये तो अ‍ॅक्शन अवतारात दिसत आहे. हा व्हिडिओ एका कोल्ड ड्रिंकच्या जाहिरातीचा आहे. या व्हिडिओमध्ये शाहरुख लांब केसांसह वेगळ्या लूकमध्ये दिसत आहे. व्हिडिओ पाहून शाहरुखच्या चाहत्यांना त्याचा हा लूक आगामी 'पठाण' चित्रपटातील आहे, असे वाटत आहे.

व्हिडिओ शेअर करत शाहरुखने एक मजेशीर कॅप्शन दिले आहे
व्हिडिओच्या सुरुवातीला शाहरुख सिनेमा हॉलमध्ये त्याचा चित्रपट पाहत आहे. पुढे ट्रेनच्या वर आणि नंतर ट्रेनच्या आत तो खलनायकाशी लढा देतो. या व्हिडिओमध्ये शाहरुख काळ्या रंगाच्या सूटमध्ये दिसत आहे. तसेच या क्लिपमध्ये शाहरुख लांब केस आणि दाढीमध्ये दिसत आहे. व्हिडिओ शेअर करत शाहरुखने कॅप्शनमध्ये लिहिले की, "नाम तो सुना होगा मेरी जान? याला सॉफ्ट नव्हे, वादळ म्हणतात."

ही जाहिरात बघून शाहरुखचे चाहते खूप उत्सुक आहेत. व्हिडिओवर कमेंट करताना चाहत्याने लिहिले, "तुम्हाला आम्ही खूप मिस केले, अखेर तुम्ही आलात." दुसऱ्या एका चाहत्याने लिहिले, "पठाणमध्ये तुम्ही कसे दिसणार हे आम्ही इमॅजिन करतोय."

'पठाण'मध्ये दिसणार आहे शाहरुख
सिद्धार्थ आनंदची निर्मिती असलेल्या 'पठाण' चित्रपटात शाहरुख खान दिसणार आहे. या चित्रपटात शाहरुखसोबत दीपिका पदुकोण आणि जॉन अब्राहम हे देखील मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. मात्र, टीमने अद्याप या चित्रपटाची अधिकृत घोषणा केलेली नाही. रिपोर्ट्सनुसार, शाहरुख आणि दीपिका लवकरच चित्रपटाच्या शूटिंगसाठी स्पेनला जाणार आहेत. शाहरुखबद्दल बोलायचे झाले तर तो शेवटचा 2018 मध्ये रिलीज झालेल्या 'झिरो' चित्रपटात दिसला होता.

बातम्या आणखी आहेत...