आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराबॉलिवूडचा किंग खान शाहरुख 4 वर्षांच्या गॅपनंतर 'पठाण' या चित्रपटातून मोठ्या पडद्यावर कमबॅक करतोय. त्यामुळे या चित्रपटाची त्याचे चाहते आतुरतेने वाट बघत आहेत. पण हा चित्रपट चांगलाच वादात सापडला आहे. चित्रपटातील 'बेशरम रंग' या गाण्यात दीपिकाने परिधान केलेल्या भगव्या रंगाच्या बिकिनीवरुन चांगलेच वादंग उठले आहे. या चित्रपटाबाबत देशभरात निदर्शने सुरू आहेत. यूपीमध्ये तर या चित्रपटाविरोधातील आंदोलनं थांबण्याचे नाव घेत नाहीये. अयोध्येतील साधूसंतांनी पठाण चित्रपटाविरोधात आघाडी घेतली आहे.
अयोध्येतील तपस्वी छावणीचे संत महंत परमहंस दास यांनी अभिनेता शाहरुखबाबत मोठे वक्तव्य केले आहे. जर जिहादी शाहरुख मला भेटला तर मी त्याला जिवंत जाळून टाकेन, असे वादग्रस्त वक्तव्य त्यांनी केले आहे. काही दिवसांपूर्वी अयोध्या हनुमानगढीचे महंत राजुदास यांनीही असेच प्रक्षोभक वक्तव्य केले होते. ज्या चित्रपटगृहांमध्ये 'पठाण' हा चित्रपट प्रदर्शित होईल, ते जाळून टाका, असे ते म्हणाले होते.
काय म्हणाले महंत परमहंस दास?
'पठाण चित्रपटात आमच्या भगव्या रंगाचा अपमान करण्यात आला आहे. आमचे सनातन धर्माचे अनुयायी याला सातत्याने विरोध करत आहेत. आज आपण शाहरुख खानचे पोस्टर जाळले, मी त्याचा शोध घेत आहे. जिहादी शाहरुख खान कुठे सापडला तर त्याला जिवंत जाळून टाकेन,' असे वक्तव्य परमहंस दास यांनी केले आहे. यासोबतच परमहंस दास यांनी असेही म्हटले की, 'जर कोणी ते जाळण्याचे धाडस केले तर मी स्वतः त्याचा खटला लढेन.'
अयोध्या हनुमानगढीचे महंत राजुदास काय म्हणाले होते?
याआधी अयोध्या हनुमानगढीचे महंत राजू दास यांनी पठाण चित्रपटाबाबत म्हटले होते की, 'शाहरुखने सनातन धर्माची अनेकदा खिल्ली उडवली आहे. चित्रपटात दीपिकाने भगव्या पोशाखात बिकिनी घालून नग्न प्रदर्शन करण्याची किंवा लोकांच्या भावना दुखावण्याची काय गरज होती. ज्या थिएटरमध्ये पठाण दाखवला जाईल ते जाळून टाका' असे ते म्हणाले होते.
25 जानेवारीला प्रदर्शित होतोय चित्रपट
चित्रपटातील 'बेशरम रंग' या गाण्यात दीपिकाचा ग्लॅमरस अवतार पाहायला मिळत आहे. शाहरुख आणि दीपिकाच्या डान्स मूव्हजही बोल्ड आहेत. या गाण्याला शिल्पा रावने आवाज दिला आहे, तर विशाल-शेखरने ते संगीतबद्ध केले आहे. हे गाणे वैभवी मर्चंटने कोरिओग्राफ केले आहे. दीपिकाने या गाण्यात भगव्या रंगाची बिकिनी घातली आहे. त्यामुळे केवळ पठाणवर बहिष्काराचीच मागणी होतेय असे नाही तर चित्रपटाचा निषेधही केला जात आहे.
'पठाण' 25 जानेवारीला प्रदर्शित होणार आहे. तो हिंदीसोबतच दाक्षिणात्य भाषांमध्येही प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात दीपिका आणि शाहरुखसोबत जॉन अब्राहम देखील दिसणार आहे. जॉन खलनायक बनला आहे. या चित्रपटाचा टिझर महिनाभरापूर्वी रिलीज झाला होता. अनेकांना तो आवडला नाही. नेटक-यांच्या म्हणण्यानुसार, हा चित्रपट हॉलिवूड चित्रपट 'वॉर' आणि 'मार्व्हल्स'ची कॉपी आहे.
किंग वाचा सविस्तर...
बॉलिवूडचा कोण आहे ही डिझायनर जाणून घ्या...
शाहरुख खान आणि दीपिका पदुकोण स्टारर 'पठाण' हा चित्रपट रिलीजपूर्वीच वादात सापडला आहे. बुधवारी त्याचा टीझर रिलीज करण्यात आला. त्याचे पहिले गाणे 'बेशरम रंग...' देखील रिलीज झाले आहे. यामध्ये शाहरुख खान आणि दीपिका पदुकोणने अतिशय हॉट आणि बोल्ड सीन्स दिले आहेत. या गाण्यात दीपिकाने भगव्या रंगाचा बोल्ड ड्रेस परिधान केला आहे, त्यामुळे चित्रपटाला विरोध केला जात आहे. वाचा सविस्तर...
दीपिका पदुकोण आणि शाहरुख खान यांच्या 'पठाण' चित्रपटातील 'बेशरम रंग' हे गाणे सध्या ट्रेंडमध्ये आहे. चाहते हे गाणे खूप एन्जॉय करत आहेत. मात्र, आता हे गाणे मूळ नसून कॉपी असल्याची चर्चा सोशल मीडियावर रंगू लागली आहे. सोशल मीडियावर काही ट्रोलर्स या गाण्याची तुलना फ्रेंच गायक झैनच्या 'मकिबा' गाण्याशी करत आहेत. 'मकिबा' या गाण्यातून 'बेशरम रंग'चे बॅकग्राउंट बीट चोरण्यात आल्याचे ट्रोलर्सचे म्हणणे आहे. वाचा सविस्तर...
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.