आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सेलेब्स ट्रोलिंग:श्रीगणेशाचा फोटो पोस्ट केल्याने ट्रोल झाला शाहरुख खान, ट्रोलर म्हणाले - 'तू विसरलायस की तू एका मुस्लिम कुटुंबाचा भाग आहेस'

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • शाहरुखच्या या पोस्टचा काही कट्टरपंथीयांनी केला कडाडून विरोध

बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानच्या घरी दरवर्षी गणपती बाप्पाचे आगमन होते. अनंत चतुर्दशीच्या दिवशी शाहरुखने सोशल मीडियावर गणपती विसर्जनाचा फोटो शेअर केला होता. पण त्यामुळे तो नेटकऱ्यांच्या निशाण्यावर आला आहे. गणपती विसर्जनाच्या फोटोमुळे तू इस्लाम विसरला आहेस अशा भाषेत शाहरुखला ट्रोल करण्यात येत आहे. 'तू एक रोल मॉडेल आहेस. तू असे का करतोस?', असा प्रश्न ट्रोलरने शाहरुखला विचारला आहे.

गणपती बाप्पा मोरया
शाहरुख खानने फोटो शेअर करत लिहिले, 'जो पर्यंत गणपती बाप्पा पुढच्या वर्षी आपल्या घरी येत नाहीत तो पर्यंत त्याची कृपा आमच्यावर अशीच राहूदे. गणपती बाप्पा मोरया!'

शाहरुखच्या या पोस्टचा काही कट्टरपंथीयांनी केला कडाडून विरोध
शाहरुखच्या या पोस्टचा काही कट्टरपंथीयांनी कडाडून विरोध केला आहे. तर काहींनी शाहरुख त्याच्या कुटुंबात धर्मनिरपेक्षता रुजवत आहे, असे म्हणत त्याचे समर्थन केले आहे. शाहरुखला ट्रोल करत एका नेटकऱ्यांने म्हटले, 'तू तर आधीच तुझा धर्म बदलला आहेस.' तर आणखी एकाने लिहिले, 'देव तुला योग्य मार्गावर आणेल. फक्त काही लोकांना आनंदित करण्यासाठी तू तुझ्या सगळ्या सीमा ओलांडल्या आहेस. तू विसरलायस की तू एका मुस्लिम कुटुंबाचा भाग आहेस.'

शाहरुखचे आगामी प्रोजेक्ट्स
शाहरुख 'पठाण' या अॅक्शन-थ्रिलर चित्रपटाद्वारे पुनरागमन करत असून त्याच्यासह दीपिका पदुकोण आणि जॉन अब्राहम दिसतील. सिद्धार्थ आनंद या चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहेत. अद्याप या चित्रपटाच्या प्रदर्शनाबाबत कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. दरम्यान, शाहरुखचे नाव इतर अनेक प्रोजेक्टसोबत जोडले गेले आहे. मीडिया रिपोर्टनुसार, त्याने तामिळ चित्रपट निर्माता एटलीचा चित्रपट साइन केला आहे, ज्यामध्ये तो नयनतारासोबत काम करणार आहे. याशिवाय तो दिग्दर्शक राजकुमार हिराणी यांचा आगामी चित्रपट देखील करत असल्याचे म्हटले जाते. चाहते शाहरुखच्या पुढील चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. 2018 मध्ये 'झिरो' या चित्रपटात तो शेवटचा मोठ्या पडद्यावर दिसला होता.

बातम्या आणखी आहेत...