आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशाहरुख खानच्या 'मन्नत' या बंगल्यातील सुरक्षेतील हलगर्जीपणाचे प्रकरण समोर आले आहे. गुरुवारी रात्री उशिरा दोन तरुण भिंतीवरून उडी मारत बंगल्याच्या तिसऱ्या मजल्यावर पोहोचले. मात्र, सुरक्षा रक्षकांनी त्यांना पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले.
दोन्ही मुलांचे वय 21 ते 25 वर्षे असल्याचे सांगण्यात येत असून दोघेही गुजरातचे आहेत. पोलिसांनी दोघांविरुद्ध भादंवि कलम 452/34 अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
शाहरुख घरी नव्हता, सर्वात पहिले गार्डने पाहिले
मीडिया रिपोर्ट्सनुसार, या घटनेच्या वेळी शाहरुख खान घरी नव्हता. दोन्ही मुलं बंगल्याच्या तिसऱ्या मजल्यावर पोहोचली होती. प्रथम सुरक्षा रक्षकाने हे पाहिले. ही घटना रात्री 9.30 वाजता घडली. पोलिसांच्या चौकशीत दोघेही सुरतचे रहिवासी असून शाहरुखला भेटण्यासाठी मुंबईत पोहोचल्याचे सांगण्यात आले. दोघांचे गुन्हेगारी रेकॉर्ड तपासले जात आहेत.
शाहरुखने 2001 मध्ये 'मन्नत' बंगला खरेदी केला
शाहरुखने 2001 मध्ये बाई खोरशेद भानू संजना ट्रस्टकडून 'मन्नत' हा पांढरा संगमरवरी बंगला 13.32 कोटी रुपयांना लीजवर खरेदी केला होता. चार वर्षे चाललेल्या नूतनीकरणानंतर त्याचे नाव मन्नत ठेवण्यात आले. मुंबईस्थित फकीह अँड असोसिएट्सने ६,००० चौरस फुटांचा बंगला डिझाइन केला आहे. शाहरुख-गौरीच्या या बंगल्याची रचना 20 व्या शतकातील ग्रेड-3 हेरिटेजची आहे, जी सर्व बाजूंनी उघडते.
शाहरुख खानचे कुटुंब 6 मजली मन्नतमध्ये फक्त 2 मजल्यांमध्ये राहते. उर्वरित मजले कार्यालये, खासगी बार, खासगी थिएटर, जलतरण तलाव, अतिथी कक्ष, जिम, लायब्ररी, खेळाचे क्षेत्र आणि पार्किंग यांसारख्या इतर सुविधांसाठी वापरले जातात.
गौरी खानने केले इंटेरियर डिझाइन
इंटेरिअरसोबत स्टाइलिंगही गौरीनेच केले आहे. यासाठी तिला चार वर्षांहून अधिक काळ लागल्याचे ती सांगते. ती प्रवास करायची, तिच्या आवडीची प्रत्येक वस्तू विकत घ्यायची आणि घराचा प्रत्येक कोपरा पूर्ण उत्साहाने सजवायची, जेणेकरून सर्व काही परिपूर्ण वाटेल. त्यानंतरच गौरी इंटीरियर डिझायनर म्हणून काम करू लागली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.