आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'पठाण ही तर फक्त सुरुवात, खरा रेकॉर्ड आता होणार':'जवान'च्या सेटवरून शाहरुखचा फोटो व्हायरल, चेहऱ्यावर पट्टी गुंडाळून दिसला

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूडचा किंग शाहरुख खानचा 'पठाण' हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालतोय. आता 'पठाण'नंतर शाहरुख आगामी 'जवान' या चित्रपटात झळकणार आहे. सध्या 'पठाण'च्या यशाचा आनंद साजरा करणारा शाहरुख आता कामावर परतला आहे. त्याने 'जवान'च्या चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात केली आहे. त्याचा सेटवरील एक फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या फोटोत शाहरुख खान लांब केसांमध्ये चेहऱ्याला एक पट्टी गुंडाळून उभा असलेला दिसत आहे. एटली दिग्दर्शित या चित्रपटाचे शूटिंग सध्या मुंबईत सुरू आहे.

शाहरुखचा शूटिंग सेटवरील हा फोटो बघून चाहते या चित्रपटासाठी आणखीनच उत्सुक असल्याचे दिसत आहेत. 'पठाण'च्या यशा अडकून न राहता शाहरुख त्याच्या आगामी प्रोजेक्टवर लक्ष केंद्रित करत आहे. 'पठाण'प्रमाणे 'जवान'ही बॉक्स ऑफिसचे सर्व रेकॉर्ड मोडेल, असा विश्वास चाहत्यांना आहे.

शाहरुखचा फोटो पाहून चाहते झाले वेडे
शाहरुखचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताच चाहत्यांचा उत्साह शिगेला पोहोचला आहे. एका चाहत्याने लिहिले, 'पठाण ही फक्त सुरुवात होती.'

एका चाहत्याने लिहिले की, 'पठाण फक्त एक झलक होती, जवान अजूनही यायचा आहे.'

एका चाहत्याने लिहिले, 'खरा मॉनस्टार अजून यायचा आहे.'

2 जून 2023 रोजी प्रदर्शित होणार आहे 'जवान'
शाहरुखचा 'जवान' हा चित्रपट 2 जून 2023 रोजी पाच भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. दक्षिणेचा प्रसिद्ध दिग्दर्शक एटली याने या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. तर अनिरुद्धने चित्रपटाला संगीत दिले आहे. शाहरुखशिवाय या चित्रपटात विजय सेतुपती आणि नयनतारा यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत.

'जवान'मध्ये अनेक हाय-ऑक्टेन अ‍ॅक्शन सीन आहेत, ज्यात शाहरुख त्याच्या नेव्हर सीन अवतारात दिसणार आहे. चित्रपटात थलापती विजयचा कॅमिओ देखील असल्याची बातमी आहे, परंतु सध्या या बातमीबद्दल कोणतीही अधिकृत माहिती नाही.

बॉक्स ऑफिसवर पठाणची यशस्वी घौडदौड सुरूच
'पठाण'ची चित्रपटगृहांमध्ये यशस्वी घौडदौड सुरू आहे. या चित्रपटाने पहिल्या आठवड्यात 318.50 कोटींची कमाई केली आहे. रिलीजच्या सातव्या दिवशी म्हणजेच मंगळवारी या चित्रपटाने 22 कोटींची कमाई केली आहे. तर बुधवारी चित्रपटाच्या कमाईचा आकडा 18 कोटी इतका आहे. 'पठाण' हा पहिल्या आठवड्यात सर्वाधिक कमाई करणारा हिंदी चित्रपट ठरला आहे.

'पठाण'ने 'KGF 2' आणि 'बाहुबली 2'च्या हिंदी व्हर्जनचे रेकॉर्ड तोडले आहेत. तामिळ आणि तेलुगूचे आकडे एकत्र केले तर चित्रपटाची एकूण कमाई 330.25 कोटी झाली आहे. या चित्रपटाने रिलीजच्या आठ दिवसांत जगभरात आतापर्यंत 675 कोटींचे कलेक्शन केले आहे.

पहिल्या आठवड्यात सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट
'पठाण'ने पहिल्याच आठवड्यात 300 कोटींहून अधिक कमाई करून विक्रम केला आहे. यापूर्वी, 'KGF 2'च्या हिंदी व्हर्जनने पहिल्या आठवड्यात सर्वाधिक कमाई केली होती. 'KGF 2'ने पहिल्या आठवड्यात 268.63 कोटी कमावले तर 'बाहुबली 2'ने 247 कोटी कमावले. आता 318.50 कोटींच्या कलेक्शनसह 'पठाण' या यादीत पहिल्या क्रमांकावर आला आहे.

बातम्या आणखी आहेत...