आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मक्का मशिदीत पोहोचला शाहरुख:पांढरी वस्त्रे परिधान करून दिसला, चाहते म्हणाले- अल्लाह त्याच्या प्रार्थनांचा स्वीकार करो

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

'डंकी' या चित्रपटाचे शूटिंग आटोपल्यानंतर सुपरस्टार शाहरुख खानने मक्का मशिदीला भेट दिली. सौदी अरेबियातील एका पत्रकाराने ट्विट करून शाहरुखने मक्का मशिदीला भेट देत उमराह (प्रार्थना) केल्याची पुष्टी केली आहे. शाहरुखच्या उमराहचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. व्हिडिओमध्ये शाहरुख पांढरी वस्त्रे परिधान करुन आहे.

उमरादरम्यान शाहरुख खानची छायाचित्रे...
उमरादरम्यान शाहरुख खानची छायाचित्रे...

शाहरुखने उमराह करण्याची व्यक्त केली होती इच्छा
किंग खानने खूप आधी ट्विट केले होते. ज्यामध्ये त्याने मक्का मशिदीला भेट देण्याची इच्छा व्यक्त केली होती. शाहरुखने आपल्या पोस्टमध्ये लिहिले होते- 'मक्का-मदिना इंशा अल्लाह लवकरच. मला आठवते की माझ्याकडे बरीच खेळणी होती, मी त्यांना मिस करतो. सौदीला जाऊ शकलो नाही,' अशा आशयाचे त्याने ट्विट केले होते. किंग खानचे हे ट्विट 2010 चे आहे.

सौदीत पूर्ण झाले 'डंकी'चे चित्रीकरण
शाहरुख खानने नुकतेच सौदीमध्ये राजकुमार हिराणी दिग्दर्शित 'डंकी' या चित्रपटाचे चित्रीकरण पूर्ण केले. त्याने एक पोस्ट शेअर करत चित्रपटातील सर्व कलाकारांचे आणि या शहराचे आभार मानले होते. याशिवाय त्याने सौदी अरेबियाच्या संस्कृतिक मंत्रालयाचेही आभार मानले होते.

'डंकी' या चित्रपटात शाहरुखबरोबर तापसी पन्नू दिसणार आहे. ‘डंकी’ पुढच्यावर्षी डिसेंबरमध्ये प्रदर्शित होणार आहे.

बातम्या आणखी आहेत...