आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वाढदिवसाच्या आदल्या दिवशी शाहरुखची मर्सिडीज झाली टो:नेटकरी म्हणाले- EMI भरला नाही का?

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान आज (2 नोव्हेंबर) त्याचा 57 वा वाढदिवस साजरा करत आहे. एकीकडे शाहरुखच्या घरी सेलिब्रेशनचा मूड असताना वाढदिवसाच्या आदल्या दिवशी त्याची गाडी रस्त्यावरुन उचलण्यात आली. त्याची कोट्यवधी रुपयांची व्हाईट मर्सिडीज बेंझ एस-क्लास टो करण्यात आली. या कारची किंमत 1.59 कोटी रुपये असल्याचे बोलले जात आहे.

युजर्सनी घेतली मजा

आता ही गाडी उचलण्याचे मूळ कारण कळू शकलेले नाही. एकतर गाडी खराब झालेली असू शकते किंवा पार्किंग चुकीच्या ठिकाणी केलेली असू शकते. पण हा व्हिडिओ समोर आल्यानंतर लोकांनी सोशल मीडियावर आपली मतं व्यक्त करायला सुरुवात केली.

एका नेटक-याने लिहिले की, 'या गाडीचा EMI भरलेला नसणार.' तर ही गाडी टो करण्यात आली नसल्याचे एक चाहता म्हणाला. एकाने सांगितले की, 'ही तर मर्सिडीजची सेवा आहे, सेवेसाठी गाडी पिकअप आणि ड्रॉप आहे.' आणखी एका नेटक-याने लिहिले की, 'गाडीवर राजस्थानच्या मुख्यमंत्र्यांचा फोटो आहे.'

शाहरुख खानचे आगामी चित्रपट

शाहरुखच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर पुढील वर्षी त्याचे 3 चित्रपट प्रदर्शित होणार आहेत. किंग खानने त्याच्या तिन्ही चित्रपटांचे शूटिंग पूर्ण केले आहे. 'पठाण' हा चित्रपट 25 जानेवारी 2023 रोजी प्रदर्शित होणार आहे, तर 'जवान' हा चित्रपट जूनमध्ये पडद्यावर दाखल होणार आहे. या चित्रपटात शाहरुख खानसोबत विजय, नयनतारा आणि सान्या मल्होत्रा ​​देखील दिसणार आहेत. त्यानंतर डिसेंबरमध्ये शाहरुख खानचा 'डंकी' चित्रपट येणार आहे.

बातम्या आणखी आहेत...