आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सलमान खानचा खुलासा:शाहरुख नव्हे तर सलमान असता मन्नतचा मालक, म्हणाला - वडिलांनी खरेदी करु दिला नव्हता बंगला

10 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • शाहरुखपूर्वी सलमानला मिळाली होती ऑफर

बॉलिवूड अभिनेता सलमान खानला अलीकडेच एका मुलाखतीदरम्यान विचारण्यात आले की, शाहरुख खानकडे असे काय आहे जे त्याला साध्य करता आलेले नाही. या प्रश्नाचे उत्तर देताना सलामानने खुलासा केला की, शाहरुखच्या आधी मन्नत हा बंगला खरेदी करण्याची ऑफर त्याला मिळाली होती, पण त्याचे वडील सलीम खान यांनी त्याला तो बंगला विकत घेऊ दिला नव्हता. वडिलांमुळे ती ऑफर नाकारली होती, असा खुलासा सलमानने यावेळी केला.

शाहरुखपूर्वी सलमानला मिळाली होती ऑफर

सलमान म्हणाला, "शाहरुख खानचे घर मन्नत खरेदी करण्याची ऑफर मला पहिल्यांदा मिळाली होती. त्यावेळी मी माझ्या करिअरला नुकतीच सुरुवात केली होती. जेव्हा मी माझे वडील सलीम खान यांना हे सांगितले तेव्हा त्यांनी मला सांगितले की तू एवढ्या मोठ्या घराचे काय करणार? आता मला शाहरुख खानला विचारायचे आहे की एवढ्या मोठ्या घरात तू काय करतोस?," असे सलमान गमतीने म्हणाला.

शाहरुखच्या घराची किंमत सुमारे 200 कोटी आहे
रिपोर्ट्सनुसार, शाहरुख खानचे घर सुमारे 200 कोटींचे आहे. त्याच्या घराचे क्षेत्रफळ 27,000 स्क्वेअर फुटांपेक्षा जास्त आहे. मन्नतमध्ये 6 मजले आहेत आणि प्रत्येक मजल्यावर 5 बेडरूम आहेत. या घरामध्ये खासगी चित्रपटगृह, जिम, स्विमिंग पूल आणि शाहरुखचे ऑफिस देखील आहे. या घरात तो पत्नी गौरी, मुलगी सुहाना, मोठा मुलगा आर्यन आणि लहान मुलगा अबरामसोबत राहतो.

शाहरुखचेही अलिबागमध्ये एक आलिशान घर आहे
याशिवाय शाहरुखकडे दुबईत एक घर, एक खासगी बेट आणि अलिबागमध्ये एक आलिशान घर आहे. त्याचा अलिबाग येथील सीफेस बंगला 19,960 स्क्वेअर फूट क्षेत्रात पसरलेला आहे. या आलिशान बंगल्यात हेलिपॅड आहे. या घराचे इंटीरियर त्यांची पत्नी गौरी खानने केले आहे.

'लाल सिंह चड्ढा'मध्ये एकत्र दिसणार सलमान-शाहरुख
सलमान खानच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, सध्या तो त्याच्या आगामी 'कभी ईद कभी दिवाळी' चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. याशिवा टायगर सीरिजच्या 'टायगर-3' या तिसऱ्या चित्रपटातही तो काम करत आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत कतरिना कैफही दिसणार आहे. दुसरीकडे, शाहरुख खान सिद्धार्थ आनंदच्या 'पठाण'मध्ये दीपिका पदुकोणसोबत दिसणार आहे. याशिवाय तो राजकुमार हिरानी यांच्या 'डंकी' या इमिग्रेशन ड्रामा चित्रपटाचाही एक भाग आहे. यासोबतच हे दोन्ही कलाकार आमिर खानच्या 'लाल सिंह चड्ढा'मध्येही कॅमिओ भूमिकेत दिसणार आहेत.

बातम्या आणखी आहेत...