आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'ब्रह्मास्त्र'मधील शाहरुख खानचा लूक लीक:'वानरास्त्र' रूपात किंग खान, आगीशी खेळताना दिसला

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांच्या आगामी 'ब्रह्मास्त्र' चित्रपटातील शाहरुख खानचा लूक लीक झाला आहे. या चित्रपटात शाहरुखची छोटी भूमिका आहे. आपला लूक चित्रपटातून लीक होऊ नये यासाठी शाहरुख प्रत्येक चित्रपटात प्रयत्न करत असतो, मात्र सुरक्षेची सर्व काळजी घेऊनही ते शक्य होत नाही. परंतु शाहरुखचा हा लूक पाहून चाहते खूपच उत्सुक झाले असून चित्रपटाच्या रिलीजची आतुरतेने वाट पाहत आहेत.

या चित्रपटात शाहरुख 'वानरास्त्र'ची भूमिका साकारणार आहे. व्हिडिओमध्ये शाहरुख अग्नीच्या ज्वालांमध्ये दिसत आहे. चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला, तेव्हाच चाहत्यांनी शाहरुखला चित्रपटात नोटीस केले होते. हा चित्रपट 9 सप्टेंबरला सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. अयान मुखर्जीने याचे दिग्दर्शन केले आहे. पाहा व्हिडिओ...

बातम्या आणखी आहेत...