आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आर्यन ड्रग्ज प्रकरणाचा परिणाम:20 ऑक्टोबरला निश्चित होऊ शकतील शाहरुख खानच्या 'पठाण' आणि 'लॉयन'च्या शूटिंगच्या तारखा, 'टायगर 3'वरही होतोय परिणाम

अमित कर्ण3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • 'टायगर 3'वर 'पठाण'चा परिणाम

शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानच्या जामीन याचिकेवरील निर्णय न्यायालयाने 20 ऑक्टोबरपर्यंत राखून ठेवला आहे. याचा परिणाम शाहरुख खानच्या आगामी 'पठाण' आणि 'लॉयन' या चित्रपटांवर होत आहे. 'पठाण'चे स्पेन शेड्युल शाहरुखमुळे लांबणीवर पडले आहे, तर दुसरीकडे त्याच्या 'लॉयन' या चित्रपटाचे शूटिंग डमी शूटिंग केले जात आहे.

'पठाण'च्या जवळच्या सूत्राने सांगितले, "दिग्दर्शक सिद्धार्थ आनंद 2 ऑक्टोबर रोजी स्पेनला रवाना झाले होते. मात्र, आर्यन खान प्रकरणानंतर ते भारतात परतले. निर्माते तेथे मल्लोर्का, कडीज आणि वेजर डेला फ्रोंटेरो येथे दोन गाण्यांच्या शूटिंग करणार होते. 'पठाण' हा या तीन ठिकाणी शूट होणारा पहिला चित्रपट ठरला असता."

अजयसोबत शाहरुखचे जाहिरातीचे शूटिंग स्पेनमध्येच होणार होते
स्पेन शेड्युलसंबंधित अतिरिक्त माहिती देखील आहे. 'पठाण' चित्रपटाच्या चित्रीकरणासोबतच शाहरुख खानच्या पान मसाला कंपनीच्या जाहिरातीचे शूटिंगही स्पेनमध्ये होणार होते. तिथे अजय देवगण त्याच्यासोबत येणार होता. पूर्वी ते शूटिंग लंडनमध्ये होणार होते. नंतर ते स्पेनमध्ये नियोजित करण्यात आले होते, जेणेकरून जाहिरातीसोबतच 'पठाण'चे शूटिंगही ठरलेल्या वेळेत करता येईल. मात्र, अजय देवगणच्या टीमने याचे खंडन केले आहे.

सध्या शाहरुखच्या आगामी 'लॉयन' चित्रपटाचे शूटिंग त्याच्याशिवाय मुंबईत केले जात आहे. सेटवर उपस्थित असलेल्या सूत्रांनी सांगितले की, डमी शॉट्ससह शूटिंग सुरू आहे. शाहरुखच्या बॉडी डबलवर लाँग शॉट व्हिज्युअल्स शूट केले जात आहेत.

'टायगर 3'वर 'पठाण'चा परिणाम

'पठाण' चित्रपटाच्या विलंबाचा परिणाम 'टायगर 3' वरही झाला आहे. दोन्ही एकाच बॅनरचे चित्रपट आहेत. भारतातील दोन्ही चित्रपटांचे अॅक्शन डायरेक्टर सुनील रॉड्रिग्स हेच आहेत. यासह आर्यनच्या प्रकरणात सलमानने लक्ष घातले असून शाहरुखला तोच वकिलांविषयी माहिती देत आहे. 'टायगर 3' शी संबंधित सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, "शाहरुखच्या वैयक्तिक आयुष्यात आलेल्या वादळामुळे मित्र म्हणून सलमान त्याच्या पाठिशी उभा आहे. त्यामुळे तो गेल्या आठवड्यात 'टायगर 3' च्या सुरू असलेल्या रिहर्सलला उपस्थित राहू शकला नाही. फक्त कतरिना गेल्या आठवड्यात तिच्या भागाची रिहर्सल करू शकली. पुढील दोन ते तीन दिवसांत सलमान आणि इम्रान हाश्मी रिहर्सल सुरू करतील. दहा दिवसांच्या रिहर्सलनंतर दोघेही चित्रपटाचा क्लायमॅक्स शूट करतील. या अंतर्गत, दोघांमध्ये पाकिस्तानत संघर्ष दाखवला जाईल. यासाठी पाकिस्तानी गुप्तचर संस्थेच्या ऑफिसचे सेट तयार केले आहेत. "

कतरिना सध्या हँड फाइटची रिहर्सल करत आहे. यासाठी ती दररोज चार तास प्रॅक्टिस करते. या चित्रपटासाठी 'वॉर' आणि 'शमशेरा' या चित्रपटांमध्ये अॅक्शन केलेल्या दक्षिण आफ्रिकेतील स्टंट कोरिओग्राफर्सना रिपीट करण्यात आले आहे.

बातम्या आणखी आहेत...